मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे, उद्यापासून धरणे व साखळी उपोषण...!
मोठी बातमी...
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे... उद्यापासून साखळी उपोषण...
जालना,दि.26(डि-24 न्यूज) मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा असे ते मराठा बांधवांना म्हणाले आहेत.
हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेऊन आणि त्यानंतर दोन-तीन दिवसानंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
मनोज जरांगे यांनी सोमवारी दुपारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. आता मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे काय करायचे, हे ठरवेन. पुढील एक-दोन दिवस मी उपचार घेईन. त्यानंतर लगेच पुढचा दौरा घोषित करेन.
अफवा पसरवू नका मी सुखरूप आहे..
संचारबंदीमुळे मराठा बांधवांना इकडे येणे शक्य नाही. त्यामुळे लोक सैरभैर झालेत. मी सुखरुप आहे. मला कोणीही कुठेही नेलेले नाही. तोपर्यंत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवावे. औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट बंद केले होते. त्यामुळे अफवा पसरत आहेत, त्या पसरुन देऊ नका, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांना औरंगाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत चांगली आहे. तात्काळ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहे.
What's Your Reaction?