मराठवाडा पाणी प्रश्न पेटला...20 नोव्हेंबरला रास्ता रोको
मराठवाडा पाणी प्रश्न पेटला...20 नोव्हेंबरला रास्ता रोको
सर्वोच्च न्यायालयात याचिका, मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार... पत्रकार परिषदेत अनिल पटेल यांची माहिती...कधी मिळेल मराठवाड्याला न्याय... रास्ता रोको आंदोलनात मराठवाड्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार...
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) गोदावरी पाटबंधारे विभागाने पश्चिम महाराष्ट्राच्या धरणातून मराठवाड्याला 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश काढले या आदेशाला आव्हान देण्यात आले. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्टे दिला तरीही पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांच्या दबावाखाली सरकार मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडत नसल्याने 20 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते अनिल पटेल यांनी दिली आहे. यावेळी सर्व पक्षांचे प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांनी पुढे सांगितले हक्काचे पाणी लवकर सोडले नाही तर सर्वोच्च न्यायालयात याचिका व मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी झाली आहे. पाण्याची मराठवाड्यात पिण्याच्या आत्तापासूनच टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना सुध्दा चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उद्योग व शेतीवर परिणाम होत आहे. व्यवसाय ठप्प होत असताना अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील डिपिसी बैठकीत ठराव घेत आहे की मराठवाड्याला पाणी सोडू नये हे त्यांचे अज्ञान आहे. सरकारने तेथील नेत्यांचा दबावाला बळी न पडता तात्काळ पाणी सोडावे व पूर्ण 8.6 टीएमसी पाणी जायकवाडीत यावे अशी व्यवस्था प्रशासनाने करावी. रस्त्यावर पाण्याची चोरी होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी असा पोलिस बंदोबस्त लावावा. तात्काळ पाणी सोडले नाही तर पाण्याचे तीव्र आंदोलन पेटणार असा इशारा देण्यात आला आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे सुपुत्र विलास भुमरे यांनी सांगितले पाणी सोडण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तो कायदेशीर निर्णय आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त शहरात येणार आहे सर्वपक्षीय शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊन लवकर पाणी सोडण्याची मागणी करणार आहे.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, विलास भुमरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, जगन्नाथ काळे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?