मराठा क्रांती मोर्चा अक्रामक, क्रांतीचौकात केले तीव्र आंदोलन, 5 वाजता बैठक...!
मराठा क्रांती मोर्चा अक्रामक, क्रांतीचौकात केले तीव्र आंदोलन, 5 वाजता बैठक...!
औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) जालना जिल्ह्यातील अंतरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ क्रांतीचौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करत घटनेचा निषेध केला. सरकारच्या विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. गृहमंत्री फडणवीस राजीनामा दो, जालना पोलिस अधीक्षकांना निंलबित करा, आंदोलक व महीला भगिनिंवर लाठीचार्ज करणा-या दोषींवर कारवाई करावी अशा घोषणाबाजीने क्रांतीचौक परिसर दणाणून गेला. यावेळी उपस्थित नेत्यांनी शांततेचे आवाहन केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व लाठीहल्ला प्रकरणावर दोषिंना शिक्षा झाली पाहिजे याची दिशा ठरवण्यासाठी आज सायंकाळी पाच वाजता बैठक घेऊन सर्वानुमते निर्णय घेतला जाईल. युवकांनी कायदा हातात घेऊ नये, लोकशाही मार्गाने व शांतपणे आंदोलन केले जाईल. असे विनोद पाटील यांनी जाहीर केले. झालेल्या लाठीहल्ल्याचा सर्वांनी तीव्र शब्दांत निषेध केला. बाजारपेठे बंद करण्यासाठी काही युवक अक्रामक झाले होते त्यांची नेत्यांनी समजूत काढली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत निर्णय घेतला जाईल बंद केव्हा करायचा असे ठरले. यावेळी प्रमुख नेत्यांची कालच्या घटनेवर भाषणे झाली. याप्रसंगी शेकडो मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. औरंगाबाद शहरात शांतता आहे. सर्व बाजारपेठ व सार्वजनिक वाहतूक सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी केले आहे.
What's Your Reaction?