शहरात विजेचा लपंडाव की अघोषित लोडशेडींग... नागरिक त्रस्त, कटकट गेट येथे दुपारपासून बत्ती गुल

 0
शहरात विजेचा लपंडाव की अघोषित लोडशेडींग... नागरिक त्रस्त, कटकट गेट येथे दुपारपासून बत्ती गुल

औरंगाबाद शहरात विजेचा लपंडाव की अघोषित लोडशेडींग...नागरीक त्रस्त

औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) शहरातील काही भागात विजेचा लपंडाव सुरू आहे कोणतीही कल्पना न देता काही वस्त्यांमध्ये तीन तास विजेचा प्रवाह बंद केला जात असल्याने नागरीक त्रस्त झाले आहे. सध्या पाऊस नसल्याने उकाडा वाढल्याने सतत घाम येत असल्याने मुले, जेष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत.

हि अघोषित लोडशेडींग तर नाही ना अशी शंका विजेच्या ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. शहरात आकस्मिक भारनियमनचा झटका अशा बातम्या माध्यमातून येत आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता चौधरी यांनी सांगितले काही दिवसात वीजपुरवठा पूर्ववत होणार आहे. कटकट गेट परिसरात दुपारी दोन वाजेपासून विज गुल असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. रात्री आठ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नाही. फिडरवर दुरुस्ती सुरू असून काही वेळेत वीजपुरवठा सुरू होईल असे चौधरी यांनी सांगितले. काही दिवसांपासून ग्रामीण भागासहीत शहरातील नागरिकांना भारनियमनाच्या झळा सोसाव्या लागत आहे. विजेची मागणी वाढत आहे. त्या तुलनेत वीजपुरवठा कमी असल्याने आकस्मित भारणियमांचा निर्णय घेतला आहे. राज्यात गुरुवारी दुपारी 2 हजार 900 मेगावेट विजेची गरज असताना 2000 मेगावेटचा तुटवडा होता. सायंकाळी 21 हजार मेगावॉटची मागणी होती तर 1600 मेगावेटचा तुटवडा होता. त्यासाठी दोन्ही वेळा भारनियमनाचा निर्णय घ्यावा. पाणी उपसासाठी विजेचे पंप, पंखे, वातानुकूलित यंत्राचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढत आहे. मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ बसत नसल्याने राज्यस्तरीय लोड डिस्पॅच सेंटरकडून येणाऱ्या संदेशामुळे महावितरणला अचानक भारणियमनाचा निर्णय घ्यावा लागला. अधिक्षक अभियंता चौधरी यांनी डि-24 न्यूजला सांगितले ज्या फिडरवर वसूली कमी व विजेची हानी जास्त असल्याने तेथेच काही तास भारनियमन केले जात आहे. कटकट गेट व किराडपूरा, जटवाडा रोड येथील नागरिकांनी सांगितले तीन तास विज गुल होत असल्याने त्रास होत आहे. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow