महाज्योती संशोधक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी रस्त्यावर, क्रांतीचौकात केले ठिय्या आंदोलन

 0
महाज्योती संशोधक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी रस्त्यावर, क्रांतीचौकात केले ठिय्या आंदोलन

महाज्योती संशोधक विद्यार्थी रस्त्यावर, क्रांतीचौकात केले आंदोलन

TCS, IBPS मार्फत Online परीक्षा नको, तलाठी भरतीची SIT चौकशीची मागणी...

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) विविध स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार उचड होत असल्याने MPSC मार्फत Offline परीक्षा घ्या. TCS व IBPS च्या वतीने घेण्यात येणा-या Online परीक्षा नको, तलाठी भरतीची SIT च्या वतीने चौकशी करावी या मागणीसाठी क्रांतीचौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

हा लढा विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी अशी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी अडीच तास विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आंदोलन केले.

पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्याचे कसे नुकसान होत आहे यावेळी विद्यार्थ्यांनी कथन केले. 4644 पदे भरण्यासाठी तलाठी भरतीची SIT चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. स्पर्धा परीक्षा MPSC च्या वतीने घेऊन परीक्षा शुल्क कमी करावे. पोलिस भरती तात्काळ जाहीर करावी. दरवर्षी भरती परीक्षा घेण्यात यावी. गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करावी. फेलोशिप पेपर फुटीबाबत स्पष्टीकरण द्यावे या मागण्या विद्यार्थी कृती समितीने केले आहे.

आपल्या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजेपासून महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांनी क्रांतीचौकात अक्रामक आंदोलन केले. विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात त्यांची मागणी आहे पात्रता परीक्षा रद्द करुन सरसकट सर्व पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

निवेदनात म्हटले आहे 2021 आणि 2022 प्रमाणे 2023 मध्ये महाज्योती संस्थेच्या वतीने देण्यात येणारी संशोधन फेलोशिप सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून मिळाली पाहिजे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे 18 दिवस व नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान उपोषण केले. 10 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. हायपाॅवर समितीने फेलोशिप बाबत पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करुन मंत्रीमंडळात ठेवण्याचे सूचना मुख्यमंत्र्यांनी दिले. तरी देखील 24 डिसेंबर 2023 रोजी पात्रता परीक्षा घेण्यात आली. औरंगाबाद येथे पेपर फुटीची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. तसेच 2019 साली सेट परीक्षेत आलेली प्रश्नपत्रिका पात्रता परीक्षेसाठी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आता प्रशासन 10 जानेवारी 2024 रोजी पुन्हा हि परीक्षा नव्याने घेतली. सदर परीक्षा रद्द करुन 2021 व 2022 मधील निकषांवर 2023 मधील सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी या मागणीसाठी 2 जानेवारी रोजी विज्ञान भवन, पुणे येथे महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थी आमरण उपोषण केले. आता परीक्षा नको फेलोशिप हवी या मागणीसाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीने आंदोलन केले.

या आंदोलनात प्रा.विठ्ठल कांगणे, कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश उजगरे, महासचिव राहुल मकासरे, सचिव सिध्दार्थ पानबुडे,अजय गायकवाड, एड सचिन वाघमारे, एड शुभम इलग, एड मिलिंद वाहुळे आदी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

फेलोशिपच्या निवेदनात अध्यक्ष सद्दाम मुजावर, उपाध्यक्ष वैभव जानकर, कोषाध्यक्ष तय्यबा मुलांनी, शंकर वैद्य, परमेश्वर बकाल, चेतन डोळस, संतोष जाधव यांची नावे आहेत. याप्रसंगी विद्यार्थी नेत्यांची भाषणे झाली. स्पर्धा परीक्षेत पेपर फुटीच्या घटना रोखावे, तलाठी भरती परीक्षेत जास्तीचे गुण उमेदवारांना मिळाले याकडे सरकारने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थी संख्या जास्त असल्याने एकीकडचा रस्ता काही काळ बंद करावा लागला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow