महापालिका पे एण्ड पार्कींग सुरू करत आहे मग स्मार्ट रिक्षा स्टँड का नाही...?
महापालिका पे एण्ड पार्कींग सुरू करत आहे मग स्मार्ट रिक्षा स्टँड का नाही...?
रिक्षा चालक मालक संघटनांच्या बैठकीत आंदोलनाचा इशारा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) - रिक्षा चालक मालक यांच्या प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने शहरातील विविध रिक्षा चालक मालक संघटनांच्या सुभेदारी विश्रामगृहात आयोजित बैठकीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महापालिका पे एण्ड पार्कींग सुरू करण्यासाठी निविदा काढत आहे मग औरंगाबाद स्मार्ट सिटीला स्मार्ट रिक्षा स्टँडची अनेक वर्षांची मागणी असताना महापालिका आयुक्त यांनी व सत्ताधारी पक्ष निर्णय का घेत नाही. रिक्षा स्टँड नसल्याने ऑटो रस्त्यावर उभी केली तर चालान दिले जाते रिक्षा स्टँड दिले तर हि समस्या सोडवली जाऊ शकते. रिक्षाचालक परवानाधारक आहे मराठी बोलणारे आहे. नियमित टॅक्स भरतात व परवाना नुतनीकरण करतात. इंधनाचे दर वाढत आहे पण रिक्षा वाहतूकीचे दर जैसे थे आहे. प्रती किलो मीटर 18 रुपये आहे. मीटरचे दरात सुधारणा करून प्रती किलो मीटर 20 रुपये करण्याचा निर्णय परिवहन प्राधिकरणाने घ्यावा त्यासोबतच शेअर रिक्षाचे दर निश्चित करण्यात यावे. व रिक्षा चालक मालक यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने परिवहन अधिकारी जवाब दो आंदोलन करण्यात येईल असा इशारा बैठकीत रिक्षा चालक मालक कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी दिला आहे.
बैठकीत अज्जू लिडर, नाहीद फारुकी, कैलास शिंदे, जाकेर पठाण, शेख लतिफ, राजेश रावलकर, प्रकाश हेगडे, दिपक पाटील, सुरेश जाधव, इम्रान पटेल, शेख अमजद, शकील अहमद, एस.के.खलिल, अब्दुल रशीद खान, गजानन वानखेडे, मोहम्मद बशीर, मोहम्मद फारुख मेमन व विविध रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?