महापालिकेची मालमत्ता कर वसूली शंभर कोटींच्या पुढे...!
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची मालमत्ता कर वसुली 100 कोटींच्या पुढे...!
महानगरपालिकेच्या
‘शास्तीमुक्त छत्रपती संभाजीनगर’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अवघ्या 19 दिवसांत 7.43 कोटींचा कर जमा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या मालमत्ता कर वसुली मोहिमेला शहरातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 1 एप्रिल 2026 ते 24 नोव्हेंबर 2026 या कालावधीत महानगरपालिकेने एकूण 100 कोटी 60 लाख 23 हजार 749 रुपयांचा मालमत्ता कर जमा केला आहे. या कालावधीत एकूण 96 हजार 641 कर भरणा पावत्या नोंदविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘शास्तीमुक्त छत्रपती संभाजीनगर’ या विशेष अभियानालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत 6 नोव्हेंबर 2026 ते 24 नोव्हेंबर 2026 या अवघ्या 19 दिवसांच्या कालावधीत एकूण 4,378 मालमत्तांनी 7 कोटी 42 लाख 76 हजार 486 रुपयांचा मालमत्ता कर भरणा केला आहे.
या अभियानामुळे थकीत मालमत्ता कर भरण्यास नागरिकांना प्रोत्साहन मिळत असून, महानगरपालिकेच्या महसूलवाढीसही हातभार लागत आहे. शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारा महसूल वेळेत उपलब्ध व्हावा, तसेच नागरिकांनी आपल्याकडील मालमत्ता कराचा भरणा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, या उद्देशाने कर वसुली विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत.
शहरातील सर्व मालमत्ताधारकांनी ‘शास्तीमुक्त छत्रपती संभाजीनगर’ अभियानाचा लाभ घेऊन आपल्याकडील थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा आणि शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
अमोल येडगे,
आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
मालमत्ता कराच्या ओझ्यातून मुक्त होण्याची सुवर्णसंधी शहरातील सर्व नागरिकांना आहे . या संधीचा लाभ घेऊन शास्तिमुक्त छत्रपती संभाजीनगर बनवण्यास हातभार लावावा.
समीर राजूरकर
महापौर छत्रपती संभाजीनगर मनपा.
What's Your Reaction?