महापालिकेचे 19 कर्मचारी सेवानिवृत्त, आयुक्तांनी केले स्वागत

 0
महापालिकेचे 19 कर्मचारी सेवानिवृत्त, आयुक्तांनी केले स्वागत

मनपाचे 19 कर्मचारी सेवनिवृत्त

औरंगाबाद, दि.31(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वर्ग 3 व 4 अंतर्गत एकूण 19 कर्मचारी नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले आहेत.

 महानगरपालिका मुख्यालय येथील प्रशासकीय कार्यालय कक्ष येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते सेरीमोनियाल कॅप, शाल ,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन या सेवानिृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशासकांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, सौरभ जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा, मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, सहायक आयुक्त अभय प्रामाणिक, सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांची उपस्थिती होती.

या सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ अभियंता गोपिकिशन चांडक (उद्यान विभाग) यांचे सह वर्ग 3 चे जलनिर्देशक धनंजय फडके, मुख्याध्यापिका डॉ. शाहीन अहमद, कनिष्ठ लिपिक शेख मेहबूब शेख हुसेन, चित्रपट चालक शेख मोहम्मद रफीउद्दीन

वर्ग 4 चे 

माळी मिराबाई साळे, बहुउद्देशीय कामगार संजय कुलकर्णी, वॉचमन शिवाजी लोखंडे, सफाई मजूर मंडाबाई वाघमारे, मलेरिया मजूर राजेश चव्हाण, वॉचमन राम कर्डक, शिपाई शेख अहमद शेख बुढण, वॉचमन सुनील अंभोरे, सफाई मजूर मारुती कांबळे, पद्माबाई जंगले, जनाबाई शिरसाट, स्वीपर मजूर पुनमचंद चावरिया, कोंडवाडा चौकीदार सलीम उद्दीन बशीरौद्दीन , इलेक्ट्रिक पंप ऑपरेटर राजेंद्र काळे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow