महापालिकेत लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा शुभारंभ...

 0
महापालिकेत लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा शुभारंभ...

“महानगरपालिकेत लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा शुभारंभ ”

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)- महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री.जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागाच्या वतीने महानगरपालिकेच्या वतीने दिनांक : 28 ऑक्टोबर 2025 रोजी दुर्बिणीद्वारे (Laparoscopic) मोफत स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त श्री. रणजीत पाटील यांच्या शुभहस्ते सिल्कमिल कॉलनी रुग्णालय येथे करण्यात आला.

 

तसेच कैसर कॉलनी रुग्णालय ,N-8 रुग्णालय, नेहरुनगर रुग्णालय आणि सिल्कमिल कॉलनी रुग्णालय या 4 मॅटर्निटी रुग्णालयात अद्यावत शस्त्रक्रियागार(O.T.) कार्यान्वित करण्यात आले आहेत.

या अगोदर मनपा रुग्णालयात फक्त Mini Lap शस्त्रक्रिया केल्या जात होत्या परंतु आता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांच्या अथक प्रयत्नातून मनपा रुग्णालयमध्ये सुसज्ज O.T. स्थापन करण्यात आली असून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (laproscopic) सुरू करण्यात आली आहे.

दुर्बिणीद्वारे (Laparoscopic) शस्त्रक्रियेचे फायदे:

 कमी वेदना

 जंतुसंसर्गाचे प्रमाण कमी

 रक्तस्त्राव कमी

 एका टाक्याचे ऑपरेशन

 सौंदर्यदृष्ट्या उत्तम परिणाम

रुग्णास लवकरच कामावर रुजू होता येते.

या शिबिराच्या तयारीसाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिवाळीतील सुट्टीच्या काळामध्ये सुद्धा खूप मेहनत घेतली व शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता उत्कृष्ट नियोजन केले.

या शिबिरामध्ये एकूण 15 महिलांवर यशस्वीरित्या स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली असून सर्व रुग्णांची प्रकृती चांगली आहे.

महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे नागरिकांना विनामूल्य व सुरक्षित वैद्यकीय सेवा देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

तसेच, या पुढेही महानगरपालिकेच्या N-8 रुग्णालय, नेहरुनगर, सिल्कमिल कॉलनी व कैसर कॉलनी या रुग्णालयांमध्ये दुर्बिणीद्वारे (Laparoscopic) स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया नियमित करण्यात येतील.

यावेळी कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा, डॉ. अमरज्योती शिंदे, डॉ. मुकेश राठोड, डॉ. एकनाथ माले, डॉ. गोविंद नरवणे, डॉ. बाबासाहेब उणवणे, डॉ. पंडित शिरसाट, डॉ. विजय दवंडे, डॉ. संतोष देशमुख ,डॉ. बालकृष्ण राठोडकर, डॉ. डिंपल परदेशी, डॉ. कल्पना राठोड, डॉ.सुर्यकुमार ठाकूर, अल्ताफ शेख, मीनल ठोकळ, बेबीनंदा झांबरे, सुनीता बुंनगे, सुनंदा साठे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow