महाराष्ट्रात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता...?

 0
महाराष्ट्रात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता...?

महाराष्ट्रात 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता...?

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, मराठवाडा, खानदेश, तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सुसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. आज छत्रपती संभाजीनगर शहरात तापमानात घट झाली व काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उन्हाचा तडाखा कमी होता.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow