माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या स्वागतासाठी शहरात बॅनरबाजी
माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या स्वागतासाठी शहरात बॅनरबाजी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) माजीमंत्री अब्दुल सत्तार यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसले तरीही त्यांची लोकप्रियता दिसून येत आहे. आपल्या मंत्रीपदाचच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेले निर्णय अजूनही नागरिक विसरले नाहीत. त्यांच्या चाहत्यांनी शहरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जानेवारी रोजी भव्यदिव्य नागरी सत्कार सोहळा सांस्कृतिक मंडळावरील मैदानावर आयोजित केल्याने आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी शहरात बॅनरबाजी केली आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील प्रत्येक चौकात रस्त्यावर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर झळकत आहेत. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून ते चौथ्यांदा निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले. त्यांचे सामाजिक व राजकीय प्रवास शहर, जिल्हा व राज्यातील जनतेने बघितले आहे. रांगडा स्वभाव म्हणून ते परिचित आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक सर्वश्रुत आहे. परंतु त्यांना या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले नसले तरीही माजीमंत्री अब्दुल सत्तार यांचे सामाजिक कार्य व लोकनेते म्हणून लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. सिल्लोड येथे वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य सर्व रोगनिदान शिबीर, रक्तदान शिबीर, अन्नदान व विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले आहे. दुपारी चार वाजता भव्य नागरी सत्कार सोहळा त्यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे आयोजित करण्यात आला आहे. शहरात लागलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो नसल्याची चर्चा रंगली आहे. बॅनरवर अब्दुल सत्तार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची फोटो दिसून येत आहे.
What's Your Reaction?