माझ्या नादी लागू नका...मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी कोणाला दिला इशारा...!

 0
माझ्या नादी लागू नका...मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी कोणाला दिला इशारा...!

माझ्या नादी लागू नका, राज ठाकरेंचा शरद पवार व उध्दव ठाकरेंना इशारा...!

पत्रकार परिषदेत पत्रकारांवर व्यक्त केली नाराजी... महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सुरू झाले याची धग मराठवाड्यात पोहोचली, समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, आर्थिक निकषावर आरक्षण हवे, एवढी साधनसंपत्ती महाराष्ट्रात आहे त्याचा नियोजनपूर्वक उपयोग भुमीपुत्रांसाठी झाले तर आरक्षणाची गरज भासणार नाही, परप्रांतीय येथे मजा मारत आहे...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.10(डि-24 न्यूज )

महाराष्ट्रात जे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते कधी बघितले नाही. मराठवाड्यातील माझ्या दौ-याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला गेला माझ्या नादी लागू नका तुम्ही प्रस्थापित आहे तर माझ्याकडे विस्थापित लोक आहेत ते काय करतील तुम्हालाही कळणार नाही. असा इशारा शरद पवार व उध्दव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.

मराठवाड्यात माझ्या दौ-यावेळी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला यामध्ये काही पत्रकार पण होते त्यांनाही त्यांनी यावेळी इशारा दिला. मनोज जरांगे आणि माझ्या दौ-याचा काहीच संबंध नव्हता त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला गेला. मी दौरा अर्धवट सोडणार, मी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे अशा बातम्या रंगवले गेले. मी अगोदरपासूनच म्हणत आहे जे खरे आर्थिक दुर्बल व मागास आहेत त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे तो कोणताही समाज असो. राज्यात जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्याला शरद पवार व उध्दव ठाकरे खतपाणी घालत असल्याचा घणाघात त्यांनी केला. मराठवाड्यात व महाराष्ट्रात त्यांना वाटते आमचे खासदार जास्त निवडून आले म्हणून विधानसभेत पण असेच घडणार असे मुळीच होणार नाही. लोकसभा निवडणुकीत मोदी व शाहवर जनतेची नाराजी होती. संविधान बदलणार असे वक्तव्य काही भाजपाच्या नेत्यांनी केले होते त्याविरोधात जनतेने मतदान केले यामुळे भाजपाचे कमी खासदार निवडून आले तसे विधानसभेत होणार नाही. यावेळी वेगळे मुद्दे असतील पण समाजात विष पेरण्याचे काम सुरू आहे यापासून जनतेने सावध असायला हवे असा इशारा पत्रकार परिषदेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.

त्यांनी पुढे सांगितले 

सोलापूर पासून दौरा सुरू केला. दिवाळीनंतर विधानसभा आहे असे आज तरी वाटत आहे. पाहिला दौरा सुरू होत आहे. 20 ऑगस्ट पासून विदर्भ दौरा आहे.

मी मराठवाडा दौरा अवराता कसा घेतला म्हणता माझा दौरा पूर्ण केला आहे.

राज ठाकरे विरूध्द मराठा समाज असा बातम्या लावल्या गेल्या 2006 झाली पक्ष स्थापनेपासून भूमिका एकच आहे आरक्षण आर्थिक निकषावर द्यावा. महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही. शिक्षण, उद्योग उपलब्ध असताना इतर राज्यातील मुलांना संधी मिळते मात्र आपल्या राज्यातील मुलांना मिळत नाही. पुरून उरेल एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहे.

आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू यांच्यापासून हे सुरू झाले. आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना दिले पाहजे मात्र यावरून लोकांची माथी भडकावून कट केला जातो आहे.

मनोज जरांगे यांच्या पाठीमागून शरद पवार व उध्दव ठाकरे हे काम करत आहे. इथे पत्रकारही काम करत आहे. काहींना एमआयडीसी जागा मिळाल्या आहे. कोणाला टेंडर मिळाले आहे. धाराशिव(उस्मानाबाद) मध्ये लोकांना भडकवण्याचा काम पत्रकार करत होते. त्यातील कोण येणार इथपर्यंत सगळे प्रकरण झाले. आंदोलन करणारे शरद पवार, उध्दव ठाकरे गटाचे लोक होते. काल झाले त्यात उध्दव सेनेचा जिल्हा प्रमुख होता.

पवार ठाकरे यांनी समजून घ्यावे लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांच्या विरोधातील मतदान होत ते तुमच्या प्रेम पोटी केलेले नाही. संविधान बदलणार हे भाजप नेते म्हणाले त्यामुळे विरुधकांना फायदा झाला.

80 वर्षाचा माणूस मणिपूर होईल म्हणत आहे. यांना मणिपूर होऊ नये यासाठी विचार करायला होत होता. यांना जेवढ्या दंगली घडवायचा आहे तेवढे घडवणार आहे.

दुसऱ्या जातीबद्दल द्वेष शरद पवार यांच्या पक्षापासून सुरू झाला. यांनी माझ्या दौरा गोंधळ घातला माझे मोहळ उठला तर यांना जमणार नाही. यांच्याकडे प्रस्थापित आहे. माझ्याकडे विस्थापित आहे. खासदार निवडून आले त्यावर जाऊ नका. तुमचे फडणवीस यांच्या बद्दल राग असेल तर त्यांना बोला.

दहा वर्ष मोदी सत्तेत होते. ज्या मोदींनी बारामती मध्ये सांगितले मी पवारांचं बोट धरून राजकारणात आलो म्हणाले त्यांना पवार आरक्षण बद्दल का बोलले नाही. ठाकरे पाच वर्ष सोबत होते त्यांनी का बोलले नाही. तुमचे राजकारण लक लाब माझ्या नादाला लागू नका, माझे मुल काय करतील हे सांगता येणार नाही. घरी जाऊन पाठ पोट गाल आरशात बघावे लागेल.

महाराष्ट्राचा चिखल करून दाखवला आहे. सत्तेत यायचे म्हणून लहान मुलांपर्यंत जात घेऊन गेले. पवारांनी भूमिका घ्यायला पाहजे जातीच राजकारण नको तुम्हीच म्हणता मणिपूर होईल. जातीत द्वेष पासरावयाच एवढं यांच राजकारण राहील. मराठा दलीत लोकांनी यांच्या नादाला लागू नये. निवडणुका येतील जातील या जखमा बऱ्या होणार नाही.

महाराष्ट्रातील रेल्वे भरतीचे इतर राज्यात जाहिराती होते. मोठ्या शहरात किती रिक्षा 90 लाख रिक्षा आहे. यात सर्वाधिक बाहेर राज्यातील लोक आहे. हे इतर राज्यातील लोकांना कळात आहे मग महाराष्ट्रातील मुलांना कळत नाही. एवढ्या गोष्टी उपलब्ध असताना मुले बेरोजगार का..? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील काही उद्योजकांनी पत्र काढले महाराष्ट्रातील मुले घेणार नाही. शैक्षणिक संस्था महाराष्ट्रात आहे. त्या संस्थांचे मालक कोण.‌? बहुतांश मराठा समाजातील आहे तरीही मराठा समाजातील मुल शिक्षणापासून वंचित आहे. यांना कोण विचारणार यांनी हे सगळं राजकारणातून मिळवले आहे.

पत्रकारांना अवराल पाहजे. बीड मध्ये तीन पत्रकार सापडले आहे. ही कोणती पत्रकारिता आहे.

विदर्भ दौरा आहे बघू काय विघ्न आहे. बघू त्यांना कोण अणतात ते....

मराठा आरक्षण वक्तव्य....

विरोधकांच्या आधी पत्रकार राज ठाकरे यांचा आरक्षणाला विरोध या बातम्या कुणी लावल्या...?बातम्या अल्यावर ज्यांना जे हवं होत ते बाहेर आले. यांचे काय चालले हे उघड झाले.

आंदोलक म्हणून लोक भेटायला आले म्हणून भेटलो मात्र मला नंतर कळलं ते राजकीय पक्षाचे आहे.

आर्थिक दृष्ट्या मागास आहे त्याला वर अणाल ही सगळ्यांची ईच्छा आहे. शरद पवारांना मी मुलाखतीत विचारलं होत.

५० टक्के मर्यादा....

खरी गरज कुणाला हे बघितलं पाहजे. मर्यादा ओलांडणे ते नंतर आहे.

भाजप....

भाजपने देखील जातीचा वापर करत आहे. लोकसभेनंतर शरद पवार उध्दव ठाकरे विष पसरवला तयार आहे.

महायुती सोबत जाणार का याला उत्तर देताना त्यांनी सांगितले तीन लोकांची ती कंपनी आहे ते चौथ्याला का घेतील.

मराठा समाज ...

जो गरीब आहे त्याला आरक्षण मिळाले पाहजे. मनोज जरांगे यांच्या समोर मी सांगितलं हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे.

माझा सांगणं राजकीय पक्षांना नाही, समाजाला आहे. साडेतीन महिन्यानंतर कुणी दिसणार नाही.

राऊतांवर टिका...

शरद पवार यांच्या करवली आहे ते आयुष्यभर दर झिझवणे आहे.

फडणवीस शिंदे.....

सर्वांनी जातीचा वापर केला. अजित पवार, शरद पवार सोबत होते तेव्हा जेम्स लेन प्रकरण सुरू होते. अजित पवार कधी जातीच राजकारण काढत नाही कोणत्याही जाती धर्माबद्दल ते बोलत नाही.

जरांगे....

गचांडी धरतो म्हटले असेल तरच त्यांना भेटल्यावर बोलेन. आंदोलक ही त्यांनी पाठवलेली माणसे नव्हती. शरद पवार ठाकरेंची माणसे होती. असा आरोप पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी लावला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow