"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना" 1 लाख 16 हजार 375 बहीणींची नोंदणी पूर्ण
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’
1 लाख 16 हजार 375 बहीणींची नोंदणी पूर्ण
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.15 (डि-24 न्यूज)-‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणीला गती आली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय असल्याने नोंदणी होत आहे,असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशीही नोंदणी सुरु होती. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 16 हजार 375 बहीणींची नोंदणी झाली आहे.
मुख्यमंत्री; माझी लाडकी बहिण या योजनेची नाव नोंदणी सुरु असून ही नोंदणी प्रत्यक्ष गावातच नारी शक्ती दूत या ॲपद्वारे अंगणवाडी सेविका, मदतनीस या करीत आहेत. शनिवार, रविवार सुटी असूनही अंगणवाडी कार्यकर्त्या, कर्मचारी तसेच शहरी भागात वार्ड ऑफिसर, अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण ही झाले आहे.
जिल्ह्यात एकूण 1 लाख 16 हजार 375 जणांची नोंदणी झाली आहे. त्यात 26 हजार 397 जणींची नोंदणी ही ऑनलाईन तर 89 हजार 978 जणींची नोंदणी ऑफलाईन झाली आहे. आता पर्यंत 3303 जणांना नोंदणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात बालविकास प्रकल्प निहाय झालेली एकूण नोंदणी याप्रमाणे- छत्रपती संभाजीनगर प्रकल्प क्रमांक 1- 5600, छत्रपती संभाजीनगर 2-6802, गंगापूर 1- 11751, गंगापूर 2- 11632, कन्नड-1-9024, कन्नड 2-9382, खुलताबाद-14140, पैठण 1-7243, पैठण 2-8150, फुलंब्री-8336, सिल्लोड 1-7331, सिल्लोड 2-4030, सोयगाव-5167, वैजापूर-7787 असे एकूण 1 लाख 16 हजार 375 जणींची नोंदणी झाली आहे.
What's Your Reaction?