मुख्यमंत्र्यांचा ताफा रस्त्यावर रोखत मार्टीची स्थापना करण्याचे दिले आश्वासन
मुख्यमंत्र्यांनी निवेदन घेण्यासाठी रस्त्यावर रोखला गाडींचा ताफा...मार्टीची स्थापना करण्याचे दिले आश्वासन
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) काल सुभेदारी गेस्ट हाऊस चिकलठाणा विमानतळ जाण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांना मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टीचे अध्यक्ष ॲड.अझहर पठाण यांनी रस्त्यावर कडेला उभे राहून आपले निवेदन मुख्यमंत्र्यांना चालत्या गाडीत हात दाखवला. मुख्यमंत्र्यांनी गाडीचा ताफा थांबवून निवेदन स्वीकारले व बार्टी, सारथी, महाज्योतीच्या धरतीवर मुस्लिम तरुणांनाच्या विकासासाठी शासनाची स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी या निवेदनावर सकारात्मक चर्चा केली अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार आम्ही लवकरच मार्टीची स्थापना करण्यासाठी निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आश्वासन दिले. मागील 2 वर्षापासून
शासन व प्रशासन स्तरावर मार्टीची स्थापनासाठी प्रयत्न चालू आहे. अशी माहिती एड अजहर पठाण यांनी डि-24 न्यूजला दिली आहे.
What's Your Reaction?