मुसळधार पावसामुळे 10 जणांचा बळी, मराठवाड्यात 523 जनावरे दगावली, अनेक घर व पिकांचे नुकसान
मुसळधार पावसामुळे 10 जणांचा बळी, मराठवाड्यात 523 जनावरे दगावली तर अनेक घरे पडली
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.3(डि-24 न्यूज) मागिल चार दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) विभागात पुरात वाहून तर विज पडून दहा जणांचा बळी गेला आहे. तर मराठवाड्यात लहान मोठे एकूण 523 जनावरे दगावली. 103 पक्क्या घरांची पडझड झाली. 1129 कच्च्या घरांची पडझड होऊन नुसतान झाले आहे. 4 झोपड्या पडल्या, 86 गोठयांचे नुकसान झाले. 3487 गावे पावसामुळे बाधीत झाली आहे. सर्वात जास्त नांदेड जिल्ह्यात 1177 गावे बाधित झाले आहे. 758 परभणी, 684 हिंगोली, 387 जालना, 178 बीड, 171 लातूर, 132 छ.संभाजीनगर(औरंगाबाद) , बाधित शेतकऱ्यांची संख्या 1462870, जिरायती शेतीचे नुकसान 1131321.12 हे-आर, 16225.00 हे.-आर बागायती शेती, फळपिके 19724.00 हे आर, एकूण शेतीचे नुकसान 1167270.12 हे. आर अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत दिली आहे.
दहा बळी....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यातील साई कडुबा बोरसे, वय, दिड वर्ष, रा.घाटशेंद्रा, तालुका कन्नड, रावसाहेब नाना बडके, मौजे शेवता, तालुका फुलंब्री, देवचंद लक्ष्मण चव्हाण, वय 60, मौजे भांबरवाडी, ता.कन्नड, संतोष विश्वनाथ थोरात, रा.माळीवाडा, कन्नड हे पुरामध्ये वाहून मृत्यू झाला. तुकाराम मोहन चव्हाण, मौजे नांदातांडा, ता.सोयगाव यांचा विज पडून मृत्यू झाला,
शिवाजी विठ्ठल शिंदे, मौजे बाणेगाव, तालुका घनसावंगी हे गोदावरी नदीत बूडून मृत्यू, मौजे ढोरसावंगी ता.जळकोट, जि.लातूर येथील नरेश अशोक पाटील, वय 24, हे ओढ्याकाठी बैल धुण्यासाठी असता पाण्यात पडून गेल्याने मयत झाले, आदीत्य डोळस(वय 21), रा.संत नामदेव नगर, ता.जि.बीड हा पुरात वाहून गेल्याने मृत्यू, सुभाष बाबूराव संवडकर, वय 38, रा.मौ.टेंभुर्णी, ता. वसमत, जि.हिंगोली,
कु.चैतन्य शेषराव ठोंबरे, वय 10, रा.सारंगवाडी, या.औंढा, जिल्हा हिंगोली नाल्याच्या पाण्यात वाहून मृत्यू
D24NEWS English News...
Torrential rains claims 10 human lives, 523 animals in Marathwada region:Sources
Chhatrapati SambhajinagarAurangabad) ,Sep 3 Due to the torrential rains since last four days across the in the Marathwada region comprising eight districts ,10 peoples have been killed by flood and lightning incident during rains .
The deceased were identified as
Raosaheb Nana Badke, Tukaram Mohan Chavan ,Devchand Laxman Chavan ,Santosh Vishwanth Chavan and Sai Kaduba Borse all are hailing from Chhatrapati Sambhajinagar district.
Shivaji Vitthala Shinde from Jalna district ,Naresh Ashok Patil from Latur district ,Aditya Dolas from Beed district ,Subhash Baburao Sawadkar and Chaitanya Sheshrao Thombre from Hingoli district , According to the Divisional Commissioner official press statement issued on Tuesday.
A total of 523 animals were also killed in Marathwada.
While ,103 concrete houses collapsed and 1129 kachcha houses have collapsed and become mere.
Apart from it 4 huts collapsed, 86 cowsheds were damaged. 3487 villages have been affected due to rain.
Nanded district is one of the worst affected with 1177 villages followed by 758 villages in Parbhani district , 684 villages in Hingoli, 178 in Beed, 171 in Latur and 132 in Chhatrapati Sambhajinagar district,report stated .
The report further stated that, 1462870 farmers were affected with loss of arable crops 1131321 hectre ,16225 hectre land of horticulture and fruit crops 19724 hectre which goes upto 1167270 hectre,the statement added.
Meanwhile,most of the water resources Major Medium ,Minor and KT weir were flooded due to heavy rainfall in the region.
What's Your Reaction?