मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढून अल्पसंख्याक समाजाला न्याय द्यावा - इब्राहिम पठाण

 0
मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढून अल्पसंख्याक समाजाला न्याय द्यावा - इब्राहिम पठाण

मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढून अल्पसंख्याक समाजाला न्याय द्यावा - इब्राहिम पठाण

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) प्रत्येक राज्याचा त्या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यातील सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र व राज्य शासनाने अनेकदा विविध कमिशन आणि कमिटीची स्थापना केली. त्या अहवालात शिफारस केली आहे की मुस्लिम अल्पसंख्याक समाज खूपच मागासलेला आहे. सर्व समाजाच्या बरोबरीने आणण्यासाठी शैक्षणिक, राजकीय व सामाजिक आरक्षण देणे आवश्यक आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण दिले तर राज्याचा विकास होईल. विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी स्काॅलर्शिप देण्यात यावी. राज्याचे प्रमुख या नात्याने मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करुन केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow