मोहम्मद याकूब महेबुब यांचे निधन
मोहम्मद याकूब महेबुब यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)-शहरातील प्रेस फोटोग्राफर अनीस रामपुरे यांचे वडील मोहम्मद याकूब महेबुब सहाब रामपुरे (वय 81, रा. आरिफ कॉलनी) यांचे अल्प आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाने रामपुरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. नमाजे जनाजा आज दुपारी 2 वाजता (नमाज-ए-जौहर नंतर) जामा मस्जिद, बुड्ढीलाइन येथे अदा करण्यात आली असून, त्यानंतर चिताखाना कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आले.
मोहम्मद याकूब सहाब यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
अल्लाह तआला मरहूम यांना मगफिरत करून जन्नतुल फिरदौस मध्ये उच्च स्थान प्रदान करो, अशी सर्वत्र प्रार्थना व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?