रोजगार मेळाव्यात शेकडो महीलांना मिळाला रोजगार, गृह उद्योगांसाठी कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न - हिशाम उस्मानी
रोजगार मेळाव्यात शेकडो महीलांना मिळाला रोजगार, गृह उद्योगांसाठी कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न - हिशाम उस्मानी
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.31(डि-24 न्यूज) आज जयसिंगपूरा येथे महीलांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी संजय वाघमारे यांच्या सहकार्याने केले असता यास महीलांचा प्रतिसाद मिळाल्याने शेकडो शिक्षित मुलींना रोजगार मिळाल्याने नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.
या मेळाव्यात व्हेराॅक, इंडोरन्स, एलआयसी, एचडिएफसी, लाईफ इन्शुरन्स कंपन्या, लूपिन, सिप्ला, धुत, एएमसी, अजिंठा या कंपन्यांनी आपले स्टाॅल लाऊन मुलींचे मुलाखत घेऊन नोकरी दिली आहे. शहर आणि जिल्ह्यातील पदव्युत्तर, पदवीधर, फार्मसी, आयटीआय, दहावी, बारावी शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणींनी सहभाग घेतला.
काही दिवसांत महीला सक्षमीकरणासाठी विविध बँकांच्या सहकार्याने गृह उद्योग सुरू करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करुन महीलांना उद्योग क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे हिशाम उस्मानी यांनी सांगितले. या रोजगार मेळाव्यात मुस्लिम युवतींनीचाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
महीला जाॅब फेअर यशस्वी करण्यासाठी संजय वाघमारे, अनिल केदारे, अमोल कांबळे, विक्की बोरीकर, हर्षद पाटील, राहुल जावळे, अभिजित सोनवणे, मोहम्मद अश्फाक, मो.इरफान, शेख वसिम अतार, मो.अजहर, मो.शहेबाज, आसिफ ख्वाजा यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?