लाड समितीच्या शिफारशीनुसार 39 सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती आदेश
लाड समितीच्या शिफारशीनुसार 39 सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती आदेश...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 4 नोव्हेंबर :
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आज दिनांक 4 नोव्हेंबर 2026 रोजी एकूण 39 सफाई कामगारांच्या पात्र वारसांना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे सभागृहात सर्वसाधारण सभेच्या मध्यंतरी नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय क्रमांक सफाई-2018/प्र.क्र.46/असाक, दिनांक 24 फेब्रुवारी 2023 नुसार सफाई कामगारांच्या सेवानिवृत्तीनंतर, स्वेच्छा सेवानिवृत्तीनंतर, रुग्णता सेवानिवृत्तीनंतर तसेच मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्याची तरतूद आहे.
या तरतुदीनुसार नियुक्तीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांचे प्रस्ताव निवड समितीसमोर सादर करण्यात आले होते. दिनांक ३ सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत एकूण 39 पात्र कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्याची शिफारस करण्यात आली होती.
त्यानुसार आज 4 नोव्हेंबर रोजी या 39 पात्र वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार महापौर समीर राजूरकर, उप महापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये व इतर पदाधिकारी सदस्य आणि आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले.
What's Your Reaction?