नंदनवन काॅलनीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस्तंभाचे लोकार्पण...
नंदनवन कॉलनी येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिस्तंभाचे लोकार्पण...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नंदनवन कॉलनी येथे उभारलेल्या महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिस्तंभाचे लोकार्पण महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती प्रेमलता मिलिंद दाभाडे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुले शाहू आंबेडकरी विचारवंत अनिल कुमार बस्ते हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे, प्रा.दिलीप महालिंगे, डॉ.बालाजी नागटिळक, डॉ. किशोर साळवे, एकनाथ भुजबळ, ऍड. धनंजय बोरडे, प्रा.सुरेश चौथाईवाले आदी उपस्थित होते.
प्रारंभी मनपाच्या शिक्षण सभापती प्रेमलाता दाभाडे व इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अरुण कुमार बस्ते यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रा.दिलीप महालिंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास गोकुळ भुजंग, एकनाथ भुजबळ, रमेश भुजबळ, ऍड. अमोल घोबळे, विशाल दाभाडे, डॉ.अविनाश सोनवणे, अमित घनघाव, राहुल शिरसाट, प्रा.संजय वानखेडे, रजनीताई देहाडे, मंगल ताई महाले, आशाताई भुजबळ, कांचन भुजबळ, राहुल तुपे, अभिजीत सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
What's Your Reaction?