सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.... उद्या फटाक्यांची आतिषबाजी...

 0
सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.... उद्या फटाक्यांची आतिषबाजी...

सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद... उद्या फटाक्यांची आतिषबाजी...

 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने आज रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. उस्मानपुरा येथील करमकृपा बिल्डिंग येथे जयंती उत्सव समितीच्या कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख मार्गदर्शक बाबुराव कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक नवीनसिंग मनमोहनसिंग ओबेराय, विजय कांबळे, नितीन सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्री.कदम यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या रक्तदान शिबिरात जवळपास 100 दात्यांनी रक्तदान केले. यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष नवीनसिंग ओबेराय म्हणाले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी रक्तदान केले. उद्या सोमवारी रात्री भडकल गेट येथे फटाक्याची आतिषबाजी करून केक कापण्यात येईल. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 9 वाजता भडकल गेट येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार व प्रमुख मार्गदर्शक बाबुराव कदम हे मिरवणुकीतील पहिल्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून मिरवणुकीला प्रारंभ करतील. जयंती उत्सव समिती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्वच कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री.ओबेरॉय यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow