लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसच्या ईव्हिएम हटावो हस्ताक्षर अभियानास जनतेचा भरपूर प्रतिसाद
 
                                लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसच्या ईव्हिएम हटावो हस्ताक्षर अभियानास जनतेचा भरपूर प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) आज महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने ईव्हिएम हटावो बॅलेट पेपर लावो या मागणीसाठी हस्ताक्षर अभियान सुरू करण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ आज दुपारी एक वाजता रेल्वेस्टेशन प्रवेशद्वारावर शहर जिल्हा कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी विविध शहरातून व स्थानिक नागरिकांनी हस्ताक्षर अभियान यशस्वी करण्यासाठी सही करुन प्रतिसाद दिला. यापुढे देशात व राज्यात होणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेटपेपरवर घ्यावे. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी हस्ताक्षर अभियान शहरातील प्रत्येक वार्डात 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत घेतले जाणार आहे. रेल्वेस्टेशन वर सही करण्यासाठी गर्दी उसळली होती. अशी माहिती शहराध्यक्ष युसुफ शेख यांनी यावेळी दिली. सही केल्यानंतर प्रतिक्रिया देताना नागरीकांनी सांगितले विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावरून मतदारांचा विश्वास ईव्हिएम मशिनवर राहिलेला नाही. सरकारने यापुढे होणा-या सर्व निवडणुका देशात बॅलेट पेपर वर घ्यावे यामुळे लोकशाही मजबूत होईल व संविधानाचे रक्षण होईल. आगामी महापालिका निवडणूक बॅलेट पेपर वर घ्यावे. अशीही मागणी केली आहे.
यावेळी आकेफ रझवी, इंजिनिअर शेख इफ्तेखार, उमाकांत खोतकर, मुदस्सर अन्सारी, सुनिल साळवे, योगेश घोतात, अशोक बनकर, साहेबराव बनकर, श्रीकृष्ण काकडे, जफर खान, शफीक शहा, कैसर बाबा, अनिता भंडारी, शिलाताई मगरे, शकुंतला साबळे, विद्याताई घोरपडे, चंद्रप्रभा खंदारे, ईंदूताई खरात आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            