लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे निघाले आदेश
 
                                लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, अशोक भंडारींची बदली नागपूरला
औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील 130 पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश आज गृह विभागाने काढले आहे. पोलिस निरीक्षक राजश्री आडे अशोक भंडारी, संतोष पाटील, कैलास देशमाने, प्रशांत पोतदार यांची नागपूर शहर, विनोद सलगरकर यांची गडचिरोली, हनुमंत गिरमे यांची अमरावती शहर, तर पिंपरी चिंचवड येथील पोलिस निरीक्षक अनिल देवडे औरंगाबाद शहर, नागपूर शहरातील पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख, कृष्णाचंद्र शिंदे यांची बदली औरंगाबाद शहर, अमरावती येथील पोलिस निरीक्षक रेखा लोंढे औरंगाबाद शहर, गडचिरोली येथील पोलिस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांची बदली औरंगाबाद शहरात झाली आहे. गृह विभागाने आजच या बदलीचे आदेश काढले आहेत.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            