लोकसभा निवडणूक, चेकपोस्टवर 24 लाखांची दारु, 77 लाखांचा गुटखा जप्त

 0
लोकसभा निवडणूक, चेकपोस्टवर 24 लाखांची दारु, 77 लाखांचा गुटखा जप्त

लोकसभा निवडणूक, चेकपोस्टवर 24 लाखांची दारु, 77 लाखांचा गुटखा जप्त

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीत पथकाची करडी नजर आहे. मतदारसंघात 26 चेकपोस्ट वर आतापर्यंत 12 हजार 46.8 लिटर 24 लाख 46 हजार रुपये किंमतीची दारु, 77 लाख 64 हजार 457 रुपयांचा गुटखा व ड्रग्ज जप्त केला आहे. 11 चाकू, 1 गुप्ती, 22 तलवारी, 5 कोयते आणि 2 पिस्तूल व चार काडतूसे पकडण्यात चेक पोस्ट पथकाला यश आले नाही.

प्रचाराचा जोर वाढला आहे. सर्व पक्षांचे व अपक्ष उमेदवारचे जाहीर सभा, पदयात्रा, काॅर्नर मिटींगा सुरू आहे. जसजशी निवडणुकीची तारीख 13 मे जवळ येत आहे मतदारांना खानपानांचे प्रलोभने दिली जात आहे. त्यासाठी दारु व गुटख्याला प्राधान्य दिले जात आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी अवैध वाहतूकीवर निवडणूक आयोगाची करडी नजर आहे. चेकपोस्ट वर कडक तपासणी सुरू असल्याने शस्त्रसाठा व दारु पकडण्यात 6 दिवसांत यश आल्याचे निवडणूक अधिका-यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow