वंचितने केले क्रांतीचौकात बोंबाबोंब आंदोलन, शासकीय नोकरीत कंत्राटीकरणचा विरोध

 0
वंचितने केले क्रांतीचौकात बोंबाबोंब आंदोलन, शासकीय नोकरीत कंत्राटीकरणचा विरोध

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज क्रांती चौक येथे सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन संपन्न

आंदोलनात सरकारने काढलेल्या आदेशाची केली होळी

राज्य केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्ते यांनी ठोकल्या बोंबा

शासकीय नोकरीत कंत्राटीकरणच्या जी.आर.च्या झेरॉक्स प्रतची केली होळी

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य सरकारने घेतलेल्या शासकीय कर्मचारी भरती शिपाई परिचर ते कनिष्ठ अभियंत्या पर्यंत  खाजगी कंपन्या मार्फत करण्याचा घेतलेला निर्णय त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरातील मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील गरीब रुग्णांना आधार देणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी, राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका महापालिकांच्या शाळा खाजगी विकासकांना चालवण्यासाठी देण्याचा निर्णय असेल 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा असेल असे अनेक निर्णय राज्य सरकारने मागील काही दिवसांमध्ये घेतलेले आहे या सर्व निर्णयांचा वंचित बहुजन आघाडी निषेध करत असुन या निर्णयांची होळी करत आहे त्याचं प्रमाणे राज्य केंद्र सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन आम्ही करून निषेध व्यक्त करून सरकारने घेतलेले निर्णय रद्द करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीची असुन सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यास वंचित स्टाईल मध्ये या शहर जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल. त्याचं प्रमाणे ज्या संस्थेच्या 

विरोधात खाजगीकरण केल्या जाईल त्याला ताळा ठोको आंदोलन करण्यात येईल असेही जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी इशारा दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाठ, मराठवाडा मुख्य संघटक महेश निनाळे, मराठवाडा सचिव तय्यब जफर, पुर्व पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, पश्चिम शहराध्यक्ष संदीप शिरसाट, युवा शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, शाहीर मेघानंद जाधव, जिल्हा सम्पर्क प्रमुख गणेश खोतकर, जिल्हा संघटक सुभाष कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष पुर्व रामदास वाघमारे, प्रविण म्हस्के, औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, पि के दाभाडे, खुलताबाद तालुकाध्यक्ष मुख्तार सय्यद, गंगापूर तालुका महासचिव बाबासाहेब दुशिंग, अमृतराव डोगरदिवे, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव सुनयना मगर, शहर महिला महासचिव साधनाताई पठारे, महिला आघाडीच्या शहर सचिव सुजाता गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार, महिला आघाडीच्या गंगापूर तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते, अलका ताई सुरडकर, महिला आघाडीच्या जिल्हा सहसचिव शालिनीताई बर्फे, अशोक खिल्लारे, शहराध्यक्ष महासचिव पश्य्चिम मनोज वाहूळ, प्रविण जाधव, सिध्दार्थ बनकर, रवि लोखंडे, शुभम साळवे, गौरव लोखंडे, सईद बाबा पठाण, संतोष बनसोडे, दत्तू तारक गोकूळ भुजबळ, संतोष जाधव, महिला आघाडीच्या वाळूज जिल्हा परिषद सर्कल प्रमुख सरला जाधव, वंचित ऑटो रिक्षा चालक मालक  आघाडीचे आण्णा जाधव, विष्णू वखरे, आण्णा बनकर, बाबासाहेब वक्ते आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले

होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow