"वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रमानिमित्त ग्रंथप्रदर्शन

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमानिमित्त ग्रंथप्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज):- उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम दि. 1 ते 15 जानेवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. या वाचन पंधरवडा निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात विविध उपक्रमांचे (ग्रंथप्रदर्शन, सामुहिक वाचन इत्यादी) यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर सोमवार दि. 30 डिसेंबर रोजी कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांचे हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ग्रंथालय निरीक्षक आवजी गलांडे, ज्ञानेश्वर पैठणे, तांत्रिक सहाय्यक दिपक काळे, सुधाकर गायधनी, अनिल बाविस्कर, संजीव ठाकुर, श्रीमती नाटकर इ. सह परीसरातील वाचक व नागरीक उपस्थित होते. शहर व जिल्हयातील नागरिकांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच जिल्हा ग्रंथालयाचे सभासदत्व देणे सुरु असून, विदयार्थी, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी केले आहे
.
What's Your Reaction?






