वाढत्या बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार, भव्य तिरंगा रॅली काढली...!

 0
वाढत्या बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार, भव्य तिरंगा रॅली काढली...!

वाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा (शरदचंद्र पवार) 'एल्गार'; भव्य तिरंगा बाइक रॅलीने प्रशासन धारेवर...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारीच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि राज्यातील तरुण-तरुणींच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांच्या वतीने "बेरोजगार हक्क एल्गार" तिरंगा मोटर सायकल मोर्चा अत्यंत उत्साहात व दणक्यात पार पडला. या भव्य रॅलीच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर जोरदार ताशेरे ओढत त्यांना धारेवर धरले.

हा भव्य मोर्चा माजी मंत्री श्री. राजेश टोपे, खासदार श्री. बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली काढण्यात आला. या रॅलीमध्ये मराठवाड्यातील विविध भागांतून आलेले प्रदेश पदाधिकारी, युवक-युवती, बेरोजगार तरुण, महिला, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. हातात राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन आणि बेरोजगारीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तरुणांनी रस्ता दुमदुमून टाकला. प्रशासनाने आता तरी निद्रावस्थेतून जागे व्हावे आणि राज्यातील बेरोजगारीने होरपळणाऱ्या युवकांच्या हाताला तातडीने काम व सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून द्यावा. तरुणांच्या न्याय्य हक्कांकडे दुर्लक्ष केल्यास हा लढा केवळ या मोर्चापुरता मर्यादित न राहता, येत्या काळात राज्यभरात अधिक तीव्र व आक्रमक आंदोलन केले जाईल. युवकांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असा ठाम निर्धार या एल्गार मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.या मोर्चात मा.आ किशोर पाटील, मा.आ चंद्रकांत दानवे, मा.आ संजय वाघचौरे, जिल्हाअध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, पंकज नाना बोराडे, प्रदेश सरचिटणीस मुश्ताक अहेमद, प्रदेश सरचिटणीस प्रा. शेख सलीम सर, प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी, प्रदेश सरचिटणीस राजेश पवार, नगरसेवक नवीन ओबेराय, वि प्रदेशअध्यक्ष सुशील बोर्डे, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन

मुल्ला, सुधाकर दानवे, जिल्हाकार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण, शहरकार्याध्यक्ष आशिष पवार, विणाताई खरे, तालुकाअध्यक्ष सूर्यकांत थोरात, प्रसन्ना पाटील, डॉ‌. गुलदाद पठाण, राजेश साळुंके, अय्युब खान, मुलचंद पवार, भूषण तांबे, अजिंक्य किर्जत, शेलेंद्र खन्ना, आनंद मगरे, कुलदीप शिंदे, रवींद्र वीर, लतीफ कुरेशी, अनुराधा सोनपसारे, शारदा लोहवे, भाग्यश्री आष्टेकर, आशिष इंगळे, शेख मुबार, नईम शेख, गणेश पवार, उदयसिंग तवार, लाईकउद्दीन शेख, मयूर मगरे, फारुक शेख, योगेश घुगे, शारुख शेख, तारेख पठाण, आनंद घोडके, दिग्विजय शिंदे, आशफाक जमील खान, आदित्य कुलकर्णी, आदि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow