विशालगड येथे धार्मिक स्थळाची तोडफोड करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मुस्लिम धर्मगुरुंची मागणी
 
                                विशालगडच्या घटनेत धार्मिक स्थळाचे नुकसान करणा-या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मुस्लिम धार्मिक गुरुंची मागणी
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.18(डि-24 न्यूज) कोल्हापूर विशालगड येथील हिंसक घटनेत धार्मिक स्थळाचे नुकसान करुन पवित्र मुस्लिम ग्रंथ पवित्र कुरानचा अपमान करण्यात आले. मालमत्तांचे व गाड्यांची तोडफोड केली. दोषींवर कठोर कारवाई सरकारने करावी व मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची आर्थिक नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे मजलिस ताऊन आईम्मा व मुअज्जीन या संघटनेच्या वतीने मुस्लिम धर्मगुरुंनी विभागीय आयुक्त यांना केली आहे.
यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम धर्मगुरुंची उपस्थिती होती. यावेळी कारी मुदस्सीर उमर ईशाअती, मुफ्ती नदीम, जमील हसन खान, मुफ्ती अब्दुल सत्तार, हाफिज असरार नंदी, हाफीज अबरार, हाफिज मुस्तफा, अबरार पटेल यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            