वेरूळ -अजिंठा महोत्सवाची नियमितता राखण्यासाठी कटीबद्ध - गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

 0
वेरूळ -अजिंठा महोत्सवाची नियमितता राखण्यासाठी कटीबद्ध - गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

वेरूळ -अजिंठा महोत्सवाची नियमितता राखण्यासाठी कटीबद्ध-गृहनिर्माण मंत्री अतुल सावे                

औरंगाबाद, दि4 (डि-24 न्यूज) वेरूळ -अजिंठा महोत्सवाचे या वर्षी पुनरागमन झाले. यानंतर त्यात खंड न पडता दरवर्षी नियमित आयोजन करण्यासाठी कटीबद्ध राहू, असे आश्वासन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.           

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात आयोजित वेरूळ अजिंठा महोत्सवाची आज सांगता झाली.         

सांगता सोहळ्यास खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, सेवा हमी आयुक्त दिलीप शिंदे,मनपा आयुक्त जी. श्रीकांत,नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ,धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना,पोलीस आयुक्त मनोज लोहिया,पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया,मोक्षदा पाटील, पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांची उपस्थिती होती.                 

खा. इम्तियाज जलील यांनी वेरूळ महोत्सवात काही वर्षांपूर्वी निवेदक म्हणून सहभाग घेतल्याच्या आठवणीला उजाळा दिला. 

 

विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी महोत्सवाचे आयोजन उत्तम केले याबद्दल सर्व सहभागी शासकीय यंत्रणांचे अभिनंदन केले तसेच सर्व नागरिक, रसिक यांनी या महोत्सवात सहभागी होऊन आनंद घेतला याबद्दल आभार मानले.

 

 पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख यांनी राज्यातील पर्यटन कला आणि संस्कृती जागतिक पातळीवर नेण्यासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर आहे,असे मनोगत व्यक्त करताना सांगितले.

आज या महोत्सवात उर्मिला कानेटकर, अभिनेत्री, नृत्यांगना, वैदेही परशुरामी,कुमार शर्मा,अश्विनी महंगडी या कलाकारांची उपस्थिती होती.

 प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे उपस्थित मान्यवर आणि कलाकार यांचे आभार मानले. कथ्थक नृत्य आणि संगीतमय वातावरणात महोत्सव साजरा होत असून लेजर शोच्या माध्यमातून परिसर प्रकाशमान करण्यात आला आ

हे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow