शनिवारी राज्यस्तरीय जातनिहाय जनगणना समर्थन परिषद
शनिवारी राज्यस्तरीय जातनिहाय जनगणना समर्थन परिषद...
औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) भारतीय कम्युनिस्ट पक्ष प्रणीत अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने शनिवारी शहरातील समर्थनगर येथील गांधी भवन येथे 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत राज्यस्तरीय जातनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत काॅ.राम बाहेती यांनी दिली आहे.
या परिषदेचे आयोजन बार्शी येथील कामगार नेते, लेखक, जेष्ठ विचारवंत काॅ. प्रा.तानाजी ठोंबरे करणार आहे. संविधानाचे अभ्यासक , विचारवंत मुंबई येथील सुरेश सावंत प्रमुख वक्ते राहणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य काॅ. डॉ.भालचंद्र कांगो, राज्य सचिव काॅ. सुभाष लांडे, दलित अधिकार आंदोलनाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य सरचिटणीस काॅ. महादेव खाडे(नासिक), राज्य निमंत्रक काॅ. शिवकुमार गणवीर भंडारा व महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्य अध्यक्ष काॅ. नामदेव चव्हाण(बीड) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
What's Your Reaction?