शहरातील अनाधिकृत कॅफे वर धडक कारवाई, केली जमिनदोस्त
अनाधिकृत कॅफे कॉफी शॉप्स वरती धडक कारवाई
20 अनाधिकृत कॅफे जमीनदोस्त
छत्रपती संभाजीनगर,दि.5(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरात असलेल्या अनाधिकृत कॅफे कॉफी शॉप्स वरती आज कारवाई करण्यात आली.
यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील एकूण 3 ,उत्सव मंगल कार्यालय 1, जवळील ,अजब नगर येथील 2,एस बी कॉलेज जवळ औरंगपुरा येथे 1,उस्मान पुरा यश मंगल कार्यालय मागे 1,संत एकनाथ रंग मंदिर समोर 3,वेदांत नगर 1, वीट्स हॉटेल जवळ 1, दशमेश नगर 2, कोकणवाडी चौक 4, देवगिरी कॉलेज रोड वरील 1 असे 20 कॅफे कॉफी शॉप्स जमीनदोस्त करण्यात आले. या करिता अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 5 पथके तयार करण्यात आली होती. अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
What's Your Reaction?