शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमआयएम नगरसेवकांच्या वतीने पोलिस आयुक्तांना निवेदन...

 0
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमआयएम नगरसेवकांच्या वतीने पोलिस आयुक्तांना निवेदन...

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमआयएम नगरसेवकांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

चंपा चौक, आझाद चौक, सावरकर चौक व हडको कॉर्नर येथे सिग्नल बसविण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15 (डि-24 न्यूज) -: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, या मागणीसाठी एमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

शहरातील विविध चौकांमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे वाहतुकीचे नियमन करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी नागरिकांचा वेळ वाया जात असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन एमआयएमच्या नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले.

यावेळी वाहतूक विभागाचे एसीपी तसेच पोलीस निरीक्षक उपस्थित होते. नगरसेवकांनी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी संबंधित मागण्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

काय आहेत एमआयएम नगरसेवकांच्या प्रमुख मागण्या...?

शहरातील चंपा चौक, आझाद चौक, सावरकर चौक आणि हडको कॉर्नर येथे वाहतूक सिग्नल बसविण्यात यावेत. तसेच या चौकांमध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करून वाहतुकीचे योग्य नियमन करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

याशिवाय, जुना बाजार ते शहागंज या मार्गावर वन-वे वाहतूक व्यवस्था असतानाही काही वाहनधारक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. अशा वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow