शहरात "मिस्टर युनिव्हर्स 2023" जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा, दोन कोटी खर्च होणार

 0
शहरात "मिस्टर युनिव्हर्स 2023" जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा, दोन कोटी खर्च होणार

शहरात "मिस्टर युनिव्हर्स 2023" जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा, दोन कोटी खर्च होणार

औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज)

22 ते 27 ऑक्टोबर दरम्यान शहरात "मिस्टर युनिव्हर्स 2023" जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत इंडियन बाॅडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन, आशियाई फिटनेस अँड बाॅडी बिल्डिंग फेडरेशन, इंटरनॅशनल फिटनेस अँड बाॅडी बिल्डिंग फेडरेशनचे सरचिटणीस डॉ.संजय मोरे यांनी दिली आहे.

या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 1500 खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धा इंटरनॅशनल फिटनेस अँड बाॅडी बिल्डिंग फेडरेशन यांच्या मान्यतेने व इंडियन बाॅडी बिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशन यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

एमजीएम क्रीडा संकुल व विभागीय क्रीडा संकुल येथे या स्पर्धा होतील.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिस्टर युनिव्हर्स 2023 ही स्पर्धा भारताला मिळाल्याने महाराष्ट्रात घेण्याचे निश्चित केले.

भारत श्री, ज्युनिअर भारत श्री, ज्युनिअर महाराष्ट्र श्री , सिनियर महाराष्ट्र श्री या स्पर्धा 22,23,24 ऑक्टोबर रोजी, मिस्टर युनिव्हर्स 2023 हि स्पर्धा 25 ऑक्टोबर रोजी तर ज्युनिअर भारत श्री, वरिष्ठ भारत श्री, ज्युनिअर महाराष्ट्र श्री, सिनियर महाराष्ट्र श्री 26 ऑक्टोबर रोजी खेळाडूंना खेळण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा उद्देश भरमसाठ प्रवास खर्च, विदेशात होणारा खर्च भारतातील खेळाडूंना शक्य नसल्याने व शरीरसौष्ठव हा खेळ अत्यंत ग्रामीण भागात प्रचार व प्रसार व्हावा, याव्यतिरिक्त तरुण वर्ग व्यसनापासून अलिप्त राहिला पाहिजे. व्यायामाचा व्यासंग तरुणांनी निष्ठापूर्वक जोपासावा. 

या स्पर्धेत दोन कोटी रुपये जवळपास खर्च होणार आहे. खेळाडूंना प्रवेश निःशुल्क असणार आहे. राहण्याची व पोषक आहाराचे नियोजन केले आहे. शहरातील दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये 150 रुम बुक केले आहे. दररोज तीन हजार किलो चिकन, 20 हजार अंडी खेळाडूंना आहारात लागतील अशी माहिती पत्रकार परिषदेत संजय मोरे यांनी दिली आहे.

शहरात अशा प्रकारे मोठ्या स्पर्धा नेहमी व्हावे जेणेकरून शहरातील उद्योग व व्यवसायात भरभराटी येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या पत्रकार परिषदेत फेडरेशन परिषदेचे कोषाध्यक्ष राजेश सावंत, महाराष्ट्र बाॅडी बिल्डिंग असोशिएशनचे सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर, नरेंद्र कदम, राजेश सावंत, नंदकुमार खानविलकर तथा 29 जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow