शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यायाम शाळेचे लोकार्पण...

 0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यायाम शाळेचे लोकार्पण...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यायामशाळेचे लोकार्पण...

रुग्णांची देखभाल करतांना स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवा- पालकमंत्री शिरसाट 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉक्टर्स हे अहोरात्र रुग्णांना वैद्यकीय सेवा देतात. हे पवित्र कार्य करतांना डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची देखभाल करणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यायामशाळा त्यांना उपयुक्त ठरेल, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांशी संवाद साधला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. अरविंद गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर तसेच नंदकुमार घोडेले, जिमखाना समन्वक मिर्जा सिराज बेग, विद्यार्थी समन्वक आकांक्षा सिंग, हर्षदा शिरसाठ तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, येथे योगा आणि जिम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णालयात आलेला रुग्ण चांगले उपचार घेऊन दुरुस्त होऊन घरी जावा. त्यासाठी आपण त्यांना सेवा देतो. हे करत असतांना आपले शारिरीक व मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या व्यायामशाळेत 22 व्यायामाची साधने लावलेले आहेत. वॉकिंग ट्रॅक, इनडोअर गेम साठी हॉल असून योगासने आदींसाठीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे., अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी यावेळी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow