शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने घेतली गटशिक्षणाधिकारी यांची भेट
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने घेतली गटशिक्षणाधिकारी यांची भेट...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) आज शिक्षकांच्या खालील विविध प्रश्नासाठी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दिपालीताई धावरे मॅडम यांची भेट घेऊन खालील प्रश्नावर चर्चा केली. शिक्षकांच्या कित्येक दिवसापासून प्रलंबित असलेल्या रजा. सेवा पुस्तिका अद्यावत करण्यासाठी केंद्रीय स्तरावर कॅम्पचे आयोजन करणे. सेवा पुस्तिका पडताळणीसाठी पंचायत समिती स्तरावर कॅम्प लावणे. अधिकारी कर्मचारी यांनी पंचायत समितीला येणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांसोबत सौदाह्यपूर्वक वागणूक देणे. केंद्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धेत झालेली अनियमित्ता वरील सर्व विषयावर गटशिक्षणाधिकारी व शिक्षक समितीच्या शिष्टमंडळामध्ये सविस्तर चर्चा झाली. कार्यालयात त्यांनी त्यांच्या अधिस्त कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या व वरील सर्व प्रश्न आठ दिवसात निकाली काढण्याचे आश्वासित केले. या शिष्टमंडळामध्ये शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रणजीत राठोड, विभागीय संपर्कप्रमुख राऊफ पठाण, उर्दू विभाग प्रमुख जावेद अन्सारी, शिक्षक समितीचे जिल्हा संपर्कप्रमुख कडुबा साळवे, तालुका अध्यक्ष बबन चव्हाण, तालुका कोषाध्यक्ष प्रवीण गायकवाड, जिल्हा नेते टि के पुनवटकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, शिक्षक समितीचे तालुका सरचिटणीस विलास बापू चव्हाण आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?