शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यासाठी जय्यत तयारी

शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिवस
विविध उपक्रमांनी साजरा करणार... जय्यत तयारी...
पूर्व, मध्य, पश्चिम, फुलंब्री
शिवसेना विभागांच्या बैठका
छत्रपती संभाजीनगर, दि. 15 (डि-24 न्यूज)- हिंदुर्हदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारी हा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन शिवसेनेचे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी केले. शिवसेनेच्या पूर्व, मध्य, पश्चिम आणि फुलंब्री विभागांच्या बैठका त्यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आल्या.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारी रोजी जन्मदिवस आहे. हा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा करावा अशा सूचना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेच्या जिल्हास्तरीय घे भरारी मेळाव्यात केल्या. त्यानुसार महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्या उपस्थितीत शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी पूर्व, मध्य, पश्चिम आणि फुलंब्री विधानसभा क्षेत्रनिहाय शिवसेना विभागांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकींना महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्यानुसार 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या प्रमाणे सामाजिक तसेच लोककल्याणकारी उपक्रम राबवून त्यांचा जन्मदिवस साजरा करावा असे आवाहन केले.
पूर्व विभागाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीस उपजिल्हाप्रमुख संतोष खेडकें, विजय वाघमारे, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, उपशहरप्रमुख बापू कवळे, अनिल जैस्वाल, मकरंद कुलकर्णी, विजय सुर्यवंशी, मंगेश भाले, कृष्णा मेटे, पुरुषोत्तम पानपाट, जयसिंग होलीये, विलास राऊत, किरण सलपे, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, विभागप्रमुख सुनील धात्रक, गणेश कुलकर्णी, सुदाम देहाडे, उपविभागप्रमुख अमोल गांगवे, साहेबराव घोडके, शाखाप्रमुख गणेश राऊत आदी उपस्थित होते.
मध्य विभागाच्या बैठकीला शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, संघटक गोपाल कुलकर्णी, माजी नगरसेवक सिताराम सुरे, किशोर नागरे, मोहन मेघावाले, लक्ष्मीनारायण बाखरिया, सचिन खैरे, उपशहरप्रमुख संजय हरणे, संदेश कवडे, बाळासाहेब गडवे, सुरेश पवार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
पश्चिम आणि फुलंब्री विभागाच्या बैठकीसाठी उपजिल्हाप्रमुख गिरजाराम हळनोर, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, नितीन पवार, संजय (बापू) पवार, मनोज गांगवे, वसंतभाई शर्मा, प्रकाश कमलानी, सुनील महोरे, योगेश शर्मा, अनिल लहाने, अजय चोपडे, महेंद्र जहागीरदार, अविनाश कुलकर्णी, नंदू लबडे, दिनेश राजेभोसले, संतोष बारसे, कमलाकर जगताप, नाना जगताप, लक्ष्मण पिवळ, सोमनाथ नवपुते, सचिन वाघ, बंटी काचकुरे, अभिजित अल्किवाड, सागर बारवाल, गोपी घोडेले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती
होती.
What's Your Reaction?






