शिवाजिनगर भुयारी मार्गाचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार व अधिका-यांवर गुन्हे दाखल करा - अभिजित देशमुख

 0
शिवाजिनगर भुयारी मार्गाचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार व अधिका-यांवर गुन्हे दाखल करा - अभिजित देशमुख

शिवाजीनगर भुयारी मार्गाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ईमेल द्वारे मागणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) शहरातील छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गाचे कोणतीही तपासणी न करता घाई गरबडीत उदघाटन उरकत श्रेय घेणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी ईमेलद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. रविवारी (दि. १८) झालेल्या अवकाळी पावसात संबंधित ठेकेदाराच्या व अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले. या भुयारी मार्गात कमरे इतके पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारक, पादचारी यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ईमेलद्वारे देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे कि, एकाच पावसात छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गाची लक्तरं वेशीला टांगली गेली आहे. ही केवळ रस्त्याची नाही, तर जनतेच्या पैशांची आणि विश्वासाचाही चुराडा आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला ब्लॅकलिस्ट करा,आणि या घोटाळ्याला सामील असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करा. लोकशाहीत जबाबदारी ही निव्वळ शब्दांची नसते तर ती कृतीतून दिसली पाहिजे असे या पत्रात म्हटले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow