शिवाजी गायकवाड यांना इतिहास विषयात पीएचडी प्रदान...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापिठाची शिवाजी काशिनाथ गायकवाड यांना इतिहास विषयात विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- मूळ दरेगावचे भूमिपुत्र व हल्ली मुक्काम कर्मभूमी मिटमिटा येथील इतिहास अभ्यासक सामान्य कुटुंबातील युवक शिवाजी काशिनाथ गायकवाड यांना भारताच्या शिक्षण क्षेत्रातील सर्वात शेवटची डिग्री पीएचडी प्रदान. दिनांक 31 ऑक्टोबर 2025, शुक्रवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आभासी पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर मानव्यविद्या शाखेंतर्गत इतिहास विषयातील विद्यावाचास्पती (पीएच.डी.)पदवी करिता सादर केलेल्या प्रबंधाची मौखिक परीक्षा संशोधक विद्यार्थी म्हणून शिवाजी गायकवाड, (इतिहास) यांना दिली. संशोधक मार्गदर्शक म्हणून डॉ.कृष्णा मालकर इतिहास विभागप्रमुख श्री आसारामजी भांडवलदार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देवगांव (रं), ता. कन्नड, जि. छ. संभाजीनगर यांनी "संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील लोकलढा आणि वृत्तपत्रे : एक चिकित्सक अभ्यास"या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. यासाठी बहिस्थ परीक्षक म्हणून प्रा.डॉ.आर.आर.मुटकुळे यांनी तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागाच्या विभागप्रमुख डॉ.गीतांजली बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही खुली मौखिक परीक्षा संपन्न झाली. त्यात त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने इतिहास विषयातील विद्यावाचस्पती (पी एचडी) पदवी प्रदान करण्याची शिफारस करण्यात आली.
सदर संशोधनात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी जनआंदोलनाने,राजकीय अनास्थाचे परिणाम व सामाजिक, वर्ग,संघर्ष उद्योग, व्यापार साहित्य, कला,क्रीडा, आरोग्य, वृत्तपत्रे यांचे महत्व आणि परिणाम यावर भर दिला आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकीय घडामोडी, राज्यराज्यातील सीमा प्रश्न, संघर्ष सोडवण्यासाठी त्यात शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा भारतातील विविध राज्यांतर्गत निर्माण होणारे सामाजिक, भाषिक, व्यावसायिक, वांशीक भेद -संघर्ष सीमा प्रश्न- वाद-विवाद सोडविण्यासाठी या संशोधनाचा समाजाला निश्चित उपयोग होऊ शकतो. आणि राज्यात उद्योग व्यवसायातून राज्ये आपला सर्वांगिन विकासात पुढे जाऊ शकतात असे त्यांनी आपल्या संशोधनात विषय मांडलेला दिसून येतो. आज भारतात विविध राज्यात जसे मणिपूर -कूकी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद, नेपाळ-भारत सीमा प्रश्न, गुजरात-डांग-महाराष्ट्र सीमा प्रश्न असे विविध प्रश्नावर मार्ग या संशोधनातून निघू शकतो असे त्यांनी सांगितले.
या परीक्षेतील यशाबद्दल आमदार सतीश चव्हाण, पालकमंत्री तथा आमदार संजय सिरसाठ, राज्यपाल नियुक्त माजी व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, एमजीमचे अंकुशराव कदम कुलगुरू, सामाजिकशास्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय साळुंके, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय पर्यटन उपसंचालक विजय जाधव, ताराबाई स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका प्रा.डॉ.पुष्पा गायकवाड, प्रा.डॉ. बिना सेंगर, प्रा.डॉ.हरी जमाले, प्रा.डॉ.श्रीराम जाधव, प्रा.डॉ.व्यंकटेश लांब, सहायक कुलसचिव डॉ.पंजाबराव पडुळ, श्री.रखमाजी जाधव,जिल्हा वकील संघांचे अध्यक्ष ऍड अशोक मुळे, दिपक म्हस्के,ऍड.अपर्णा गायकवाड -मोरे, डॉ. लहू गायकवाड, प्रा.डॉ.सुनील मगरे, डॉ. संजय गायकवाड, प्रा.रामदास गायकवाड, प्रभाकर गायकवाड, डॉ.मारोती गायकवाड, प्रा.डॉ.राहुल साळवे, प्रा.डॉ.महेश रोठे, प्रा.मुकेश नायक, इंजि.अभिषेक मुदिराज, राजू वाहटुळे, अंबादास म्हस्के, दीपक बनकर, गणेश लोखंडे, प्राचार्य हसन इनामदार, डॉ. गणी पटेल, डॉ. भागवत वाघ, मुकुंद अन्वीकर, बटू नांगरे, हरी दळवी, गंगाधर जाधव आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
What's Your Reaction?