शेतकरी विठ्ठल दाभाडे आत्महत्या प्रकरणी मॅनेजर वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची अंबादास दानवेंची मागणी
 
                                शेतकरी विठ्ठल दाभाडे आत्महत्या प्रकरणी अंबादास दानवे लीड बँकेत...!
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) बँक ऑफ महाराष्ट्र लीड बँकेच्या मुख्य व्यवस्थापक यांच्याशी आज सिडको येथील कार्यालयात पीक कर्जबाबत चर्चा केली. तालुक्यातील पिंपळखुट्टा येथील विठ्ठल नामदेव दाभाडे या शेतकऱ्याने बँक मॅनेजर यांनी पीक कर्ज नाकारल्यामुळे केलेल्या आत्महत्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच पुढील सात दिवसांत जिल्ह्यातील सर्व पीक कर्ज प्रकरणे सोडविण्यात यावी अशी सूचना यावेळी केली. याप्रसंगी माझ्यासमवेत शेतकरी सेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब मोहिते, नानासाहेब पळसकर, उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, अशोक शिंदे, तालुकाप्रमुख संजय मोटे, मनोज पेरे, शंकरराव ठोंबरे व राजू वरकड उपस्थित होते..
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            