संदीपान भुमरे शिंदे गटाचे उमेदवार जाहीर, तिरंगी लढत होण्याची शक्यता
संदीपान भुमरे शिंदे गटाचे उमेदवार जाहीर, खैरेंशी रंगणार सामना
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली आहे. शिवसेनेच्या वतीने आनंद व्यक्त केले जात आहे. महायुतीच्या वतीने हि जागा शिंदे गटाला सुटली आहे. शेवटपर्यंत भाजपाला हि जागा सुटावी यासाठी प्रयत्न केले गेले पण यश मिळाले नाही. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे. आता भुमरेंना शिंदे गटाकडून उशिरा का होईना उमेदवारी मिळाल्याने चर्चेला विराम मिळाला आहे. भुमरे व खैरे दोन्ही शिवसैनिकांचा या लोकसभेत पहिल्यांदाच सामना रंगणार आहे आता पहावे लागेल बाजी कोण मारेल. भुमरे, खैरे, इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत औरंगाबाद लोकसभा मतदारसंत चुरशीची असणार आहे. राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे आहे कारण मागच्या निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी खैरेंचा पराभव करून शिवसेनेला धक्का दिला होता. आता राजकीय समीकरणे वेगळी आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना असल्याने या निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे.
संदीपान भुमरे जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाच वेळा आमदार निवडून आले आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर उध्दव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री आहे. सलग पाच वेळा पैठण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत संधी मिळाली आहे. यंदा शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा फडकतो का हे येणारा काळच ठरवेल. भाजपाकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड व मंत्री अतुल सावे हे लोकसभेसाठी इच्छुक होते. यामुळे उमेदवार जाहीर करण्यास विलंब झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने आज अधिकृत घोषणा झाल्याने महायुतीचा तिढाही सुटला आहे.
What's Your Reaction?