सकल मराठा समाजाची सोमवारी शहर व जिल्हा बंदची हाक
सकल मराठा समाजाची सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक...
मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय: जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध...
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) मराठा समाज आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंद पुकारण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत शनिवारी सर्वानुमते घेण्यात आला. या बंद मध्ये व्यापारी महासंघ आणि सामाजिक संघटनांनी आपली दुकाने बंद ठेवून सहभाग नाेंदवावा, असे आवाहन यावेळी विनोद पाटील यांनी केले.
सकल मराठा समाजाची बैठक शनिवारी एपीआय कॉर्नर येथील हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत अभिजीत देशमुख, किशोर चव्हाण, प्रा. शिवानंद भानुसे, राजू थिटे, सुनील कोटकर, ज्ञानेश्वर गायकवाड, सचीन हावळे पाटील, लक्ष्मण शिरसाट, सुरेश वाकडे, मनोज गायके, प्रा. चंद्रकांत भराट, राजेंद्र दाते , मछिंद्र देवकर, ॲड. सुवर्णा मोहिते, प्रा. मनिषा पाटील, डॉ. दिव्या पाटील, सुकन्या भोसले, रेखा वाहटुळे, मंगेश साबळे, सचीन मगर, किशोर दहिहंडे आदींनी मनोगत व्यक्त केली.
विनोद पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण रद्द होऊन पावणे दोन वर्ष होत आहे मात्र आधीच्या व आताच्या सरकारने काहीही केले नाही. किशोर चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात विधी विभागाने मे महिन्यात नियुक्त केलेल्या समितीने २९ ऑगस्ट पर्यंत अहवाल देणे अपेक्षित होते. मात्र या कालावधीत या समितीने एकही बैठक घेतली नाही. यावरून मराठा समाजाबद्दल सरकारची उदासिनता दिसत आहे.
What's Your Reaction?