सावधान...कोरोना येतोय...? महाराष्ट्रात सक्रीय रुग्णसंख्या 56....!

 0
सावधान...कोरोना येतोय...? महाराष्ट्रात सक्रीय रुग्णसंख्या 56....!

सावधान...कोरोना येतोय...महाराष्ट्रात सक्रीय रुग्णसंख्या 56....!

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) कोरोना विषाणू जगभरात पुन्हा डोकं वर काढू पाहत आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना देशभरात एकूण 257 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात पण सक्रीय रुग्ण संख्या वाढत आहे. एका आठवड्यात रुग्ण संख्या 12 वरुन 56 पर्यंत गेल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे. सर्वाधिक रुग्ण संख्येमध्ये महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर असून 95 रुग्णांसह केरळ आघाडीवर आहे. कोरोनामुळे केरळमध्ये एक रुग्ण दगावला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले घाबरण्याचे कारण नाही. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार काम केले जात आहे. पुर्वतयारी म्हणून छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद) महानगरपालिकेने डाॅक्टर, मेडिकल ऑफिसर, सिएलएमसि मैनेजर, सिएलएमसि टेक्निशियन, ओटी असिस्टंट, एक्स रे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एएनएम, स्टाफ नर्स, अकाऊंटन्ट कंत्राटी भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow