सिध्दार्थ महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन भीम गीत स्पर्धेचे आयोजन

सिद्धार्थ महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन भीम गीत स्पर्धेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त ,पूर्वसंध्येला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने कवी वामनदादा भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लढ्याचा इतिहास व कवी वामनदादा कर्डक यांनी गीतांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात जाऊन समाज प्रबोधनाचे केलेले कार्य तरुण पिढी समोर प्रेरणा निर्माण करणारे ठरावे, यासाठी हा उपक्रम सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला. या स्पर्धेत विविध महाविद्यालयाच्या 50 स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ऋतुराज काळे, संगीत विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांना तर द्वितीय पारितोषिक निखिल इंगोले सरस्वती भुवन महाविद्यालय व तृतीय पारितोषिक पौर्णिमा कांबळे, मिलिंद विज्ञान महाविद्यालय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक वैष्णवी लोळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व मंगेश सुरडकर, दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळुज यांनी पटकावले.
स्पर्धेचे पारितोषिक संस्थेचे संचालक प्रा. सुनील मगरे तसेच प्राचार्य डॉक्टर मनोहर वानखडे संचालक सौरभ मगरे यांच्या हस्ते देण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. राजू वानखेडे ,डॉ. सुकेशनी जाधव, डॉ. विनोद अंभोरे. प्रा. स्मिता शिंदे, अशीत शेगावकर , कुलदीप जाधव यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






