सोमवारी मतदान, प्रशासन सज्ज, जिल्ह्यात कडक सुरक्षा बंदोबस्त

 0
सोमवारी मतदान, प्रशासन सज्ज, जिल्ह्यात कडक सुरक्षा बंदोबस्त

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, जिल्ह्यात कडक सुरक्षा बंदोबस्त...!

लोकसभा निवडणूकीसाठी औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे 2024, सोमवार रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनूसार निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्व यंत्रणा सज्ज आहे झाली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. 

मतदारांनी मोठ्या संख्येने घरातून बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.  

याप्रसंगी पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 1 हजार 568 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, वैद्यकिय किट, पाळणाघर यासह अन्य सुविधा देत केंद्रावर पुर्ण तयारी झाली आहे. ईव्हीएमसह मतदार साहित्य बॅग सज्ज असून स्ट्राॅंग रुममध्ये सीलबंद आहेत. उद्या रविवारी सकाळी सकाळपासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ केंद्रावर मतदान साहित्य वाटपास सुरुवात होईल. बसेस, वाहतूक व्यवस्थाही सज्ज असून सायंकाळपर्यंत सर्व मतदान पथक नियोजित स्थळी पोहोचतील, असे त्यांनी सांगितले. 

मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी गेल्या काही महिन्यापासून विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहे. टक्केवारी 75 व्हावी अशी अपेक्षा आहे. मतदान निश्चिचपणे वाढले, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शहर आणि जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त तैनात...

पोलिस आयुक्तालय हद्दीत 4 पोलिस उपायुक्त, 8 सहाय्यक पोलिस आयुक्त, 37 पोलिस निरीक्षक, 178 सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह 2 हजार 534 पोलिस कर्मचारी, 1 हजार 410 होमगार्ड यासह केंद्रीय सुरक्षा बलाच्या 6 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली.

 ग्रामीण मध्ये 175 अधिकारी, 2 हजार 700 पोलिस कर्मचारी, 1 हजार 600 होमगार्ड यासह केंद्रीय सुरक्षा बलाच्या 4 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow