स्टील कंपनीत भिषण स्फोट, 24 जण जखमी, 3 गंभीर जखमी

 0
स्टील कंपनीत भिषण स्फोट, 24 जण जखमी, 3 गंभीर जखमी

स्टील कंपनीत भीषण स्फोट, 24 जण जखमी, 3 गंभीर जखमी 

जालना, दि.24(डि-24 न्यूज)

जालन्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये भयंकर स्फोट झाला आहे. या स्फोटाचा आवाज दूरवर आला. भीषण स्फोटाने जालना एमआयडीसी हादरली आहे. जालन्यातील औद्योगिक वसाहतीत स्फोटाचा आवाज आला. मिळालेल्या माहितीनुसार कज केसरी या स्टील कंपनीत दुपारच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला.

या स्फोटात 24 जण जखमी झाले तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती डि-24 न्यूजला मिळाली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी जात कंपनीची पाहणी केली मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली नाही. बॉयलरमध्ये स्फोट कसा झाला नेमके काय कारण होते हे देखील अद्याप कळू शकले नाही. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow