स्मार्ट सिटी अंतर्गत जीर्ण झालेल्या इमारतीचा अत्याधुनिक पोलिस उपायुक्त कार्यालयात परिवर्तन

 0
स्मार्ट सिटी अंतर्गत जीर्ण झालेल्या इमारतीचा अत्याधुनिक पोलिस उपायुक्त कार्यालयात परिवर्तन

स्मार्ट सिटी अंतर्गत जीर्ण झालेल्या इमारतीचा अत्याधुनिक पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 कार्यालय मध्ये परिवर्तन 

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि. 21(डि-24 न्यूज) औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमीटेड, अंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला, जिल्ह्याचे खासदार श्री. संदीपान भुमरे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य श्री भागवत कराड, शहराचे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला, या वेळी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, उपायुक्त रवींद्र जोगदंड व स्मार्ट सिटीचे प्रकल्प स्मार्ट एजुकेशन प्रकल्पाचे समन्वयक गणेश दांडगे, प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, प्रकल्प व्यवस्थापक किरण आढे, मिडिया विश्लेषक अर्पिता शरद हे उपस्थित होते.

नागेश्वरवाडी येथील जुन्या मनपा शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीत असामाजिक गतीविधी होत असताना आढळून आल्या होत्या. स्मार्ट सिटी तर्फे शहरासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून या इमारतीला नविन अत्याधुनिक पोलीस उपायुक्त झोन १ यांचा कार्यालयामध्ये परिवर्तित करण्यात आले आहे. यामुळे शहरात पोलिसांबाबत जनसमान्याचे दृष्टिकोन बदलेल व कायदा व सुव्यवस्था ठेवण्यास मदद हो

ईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow