हाके आणि वाघमारे यांच्या समर्थनार्थ झाल्टा फाटा येथे ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन...!
हाके आणि वाघमारे यांच्या समर्थनार्थ झाल्टा फाटा येथे ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले...! राज्यात ओबीसी समाज अक्रामक.... जागोजागी आंदोलन सुरू....आरक्षणाने राजकीय वातावरण तापले
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.22(डि-24 न्यूज) ओबीसी आरक्षण बचाओ व विविध मागणीसाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे मागिल दहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. राज्यात त्यांच्या स्मरणार्थ आंदोलन व उपोषण सुरू आहे. सरकार मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने ओबीसी समाज अक्रामक झाला आहे. आज सकाळी 11 वाजता झाल्टा फाटा चौकात ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करुन सरकारचा निषेध केला. ओबीसी संघर्ष योध्दे हाके, वाघमारे जिंदाबाद, शिंदे सरकार लेखी द्या, गोपिनाथ मुंडे अमर रहे, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. प्रमुख नेत्यांची यावेळी भाषणे झाली. रास्ता रोको आंदोलन सुरू असल्याने चारही बाजूंनी येणारी वाहतूक थांबली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
12 जणांचे शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल....
आज ओबीसी उपोषणकर्ते यांची भेट घेण्यासाठी सरकारचे 12 मंत्र्यांचे शिष्टमंडळ विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले. येथून मोटारीने उपोषणस्थळी वडीगोद्री येथे जाणार आहे. यामध्ये मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, आमदार गोपीचंद पडळकर, समीर भुजबळ, प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते शब्बीर अन्सारी, संतोष गायकवाड, प्रशांत जोशी, अजय पाटणे व अधिकारी यांचा समावेश आहे. शिष्टमंडळ उपोषणकर्ते प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्याशी मागणी संदर्भात चर्चा करणार आहे. त्यानंतर पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन ससाने यांची भेट घेणार आहेत. हाके आणि वाघमारे हे दहाव्या दिवशी चर्चेनंतर उपोषण मागे घेणार का याची उत्सुकता आहे
.
What's Your Reaction?