हाच का त्यांचा सनातन धर्म - शिवसेना नेते संजय राऊत यांचा घणाघात

 0
हाच का त्यांचा सनातन धर्म - शिवसेना नेते संजय राऊत यांचा घणाघात

हाच का त्यांचा सनातन धर्म आहे का...- खासदार संजय राऊत

कश्मिरच्या खो-यात चार सेनेचे अधिकारी शहीद झाले आणि पंतप्रधान स्वतः वर फुले उधळून घेत आहेत... आम्ही मराठवाड्याच्या भुमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भव्य स्वागत करुन काही प्रश्न विचारणार होतो पण त्यांचा दौरा रद्द केला...

हे सरकार बेकायदेशीर...जे प्रशासन व अधिकारी मंत्रीमंडळ बैठकीत अवाढव्य खर्च करत आहे यांना साथ देत आहे त्यांना जाब द्यावा लागेल...

औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) देशाचे गृहमंत्री अमित शहा मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवर्षानिमित्त (मोदींच्या भाषेत अमृतकाल) कार्यक्रमात उपस्थित राहणार होते त्यांचे स्वागत करण्यासाठी व काही प्रश्न विचारण्यासाठी आलो होतो पण ते आलेच नाहीत. देशाचे चार सपुत कश्मिरी खोरे अनंतनागमध्ये शहीद झाले त्या दु:खात देश आणि आम्ही बुडालो असताना पंतप्रधान स्वतःवर फुले उधळून घेत आहेत तेथे देशाचे स्वरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा सुध्दा भाजपा मुख्यालयात उपस्थित होते. हेच आहे का भाजपाचे सनातन धर्म...त्यांची जवाबदारी नाही का जवानांच्या सुरक्षेची. संघावाले त्या शहीद जवानांच्या दु:खांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते का...? स्वतःला देशभक्त म्हणायचे आणि भारत आणि इंडिया मध्ये राजकारण करायचे असे भाजपचे सुरू आहे. आमचा सनातन धर्म मानवता धर्म व माणूस म्हणून जगण्याचा मार्ग दाखवतो. यांची अशीच या हुकुमशाही विरोधात आम्ही इंडिया आघाडीची स्थापना केली. मुंबईत बाॅम्बस्फोट झाले होते त्या काळात मराठवाड्याचे शिवराज पाटील चाकूरकर हे देशाचे गृहमंत्री होते ते आढावा घेण्यासाठी त्यावेळी आले असता त्यांनी फक्त शर्ट बदलला होता तर त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि आत्ताचे सत्ताधारी स्वतः वर फुले उधळून घेत आहेत पंतप्रधानांना ह्रदय आहे की नाही असा प्रश्न देश विचारत आहे. असा घणाघात पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात बैठक घेणारे हे सरकार बेकायदेशीर आहे. त्यांना साथ देणारे अधिकारी या बैठकीवर अवाढव्य पैसे उधळत आहे त्यांना येणाऱ्या काळात याचा जाब द्यावा लागेल. जिल्हाधिकारी यांनी शहरातील पंचतारांकित सर्व हाॅटेल बुक केले म्हणे हा खर्च कशाला. आतापर्यंत ज्या बैठका झाले मुख्यमंत्री व मंत्री सुभेदारी विश्रामगृहात थांबायचे मग हि चमक धमक, मेजवानी, गाड्यांच्या ताफ्यावर अवाढव्य खर्च कशासाठी असा सवाल राऊत यांनी सरकारला विचारला. बेकायदेशीर सरकार सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. शिंदे बेकायदेशीर मुख्यमंत्री असताना चाळीस दिवसात विधानसभा अध्यक्ष यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. प्रतोद गोगावले व राज्यपाल यांनी घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असताना एवढा वेळ हे सरकार अस्तित्वात कसे असा प्रश्न संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

अमित शहा यांचा दौरा व मंत्रीमंडळ बैठकीला गालबोट लागू नये यासाठी आंतरवालि सराटी येथे सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण मागे घ्यावे असे आदेश दिल्लीतून निघाले होते असा आरोप राऊत यांनी लावला. उपोषण सोडायला मुख्यमंत्री आले दोन उपमुख्यमंत्री गायब. जवाबदारी सर्वांची आहे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची एकटे मुख्यमंत्र्यांची नाही. असे राऊत म्हणाले.

मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक सरकार घेत आहे आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावे 2016 मध्ये ते मुख्यमंत्री असताना मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे काय झाले. विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या म्हणण्यानुसार 41 हजार कोटींच्या पैकेजची घोषणा त्यावेळी त्यांनी केली होती. त्यामधून मराठवाड्याला किती पैसे मिळाले याचा हिशोब अगोदर द्या. गाय म्हशीसाठी दुध डेअरी व्यवसायाची योजना त्यांनी त्यावेळी जाहीर केली होती लाखो लोकांना रोजगार मिळणार होता. कोठे गेली त्या गाय म्हशी...गेले का संघाच्या गोशाळेत जे बेगडी सनातन धर्माचे आहे बोलतात असे म्हणत फडणवीसांवर त्यांनी टिका केली. यावेळी सुध्दा मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली जाणार हि नुसती पैशाची उधळपट्टी आहे. यामुळे मागासलेल्या मराठवाड्याचे भले होणार नाही. दुष्काळ असताना सरकार पैशाची मंत्रीमंडळ बैठकीत पैशाचा अवास्तव खर्च करत असल्याची टिका राऊत यांनी केली. 

यावेळी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow