रक्षाबंधनाची गृहीनींना भेट...घरघुती सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त... पेट्रोल डिझेलही स्वस्त होणार...

घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपये स्वस्त, पाहा बदलेले दर...
महागाई कमी होण्यास मदत... निवडणुका जवळ येत असल्याने भाजपाची खेळी असल्याची चर्चा...
नवी दिल्ली, दि.29(डि-24 न्यूज) रक्षाबंधनाच्या एक दिवसपूर्वी मोदी सरकारने देशभरातील गृहिणींना मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारने LPG सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची मोठी कपात जाहीर केली असल्याने गृहीनींना दिलासा मिळाला आहे. यामुळे महागाईवर नियंत्रण मिळण्यास मदत होईल. यासोबतच 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार असेही जाहीर केले. या निर्णयामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अलीकडच्या काळात गगनाला भिडलेल्या महागाईमुळे जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या, मात्र आता सरकारच्या या निर्णयाने सामान्य जनतेला थोडा दिलासा मिळेल. परंतु निवडणूका जवळ येत असल्याने सिलेंडरच्या किमती कमी केले असल्याची चर्चा आहे.
33 कोटी ग्राहकांसाठी 200 रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी 400 रुपयांनी दर कमी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं ओनम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा निर्णय घेण्यात आला आहे. विनाअनुदानित घरगुती LPG सिलिंडरचे दर सध्या दिल्लीत 1103 रुपये, कोलकाता 1129 रुपये, मुंबईत 1102 रुपये आणि चेन्नईत 1118.50 रुपये आहेत.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दुहेरी लाभ...
मोदी सरकारच्या या घोषणेनंतर आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना 200 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल. उज्जवला योजनेत आधीच अनुदान म्हणून 200 रुपयांचा लाभ दिला जातो. अशा प्रकारे आता त्यांना 400 रुपये सबसिडी दिली जाईल.
घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर
राजधानी दिल्लीत सध्या अनुदानाशिवाय घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपये असून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 400 रुपये मिळतील. म्हणजेच त्यांना सिलिंडरसाठी 703 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सामान्य ग्राहकांसाठी दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत 903 रुपये असेल. कमी झालेली किंमत आज रात्रीपासून लागू होणार आहे. गेल्या तीन वर्षांत देशात एलपीजी सिलेंडरच्या किमती दुपटीने वाढल्या असताना अनेक दिवसांपासून लोक घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत दिलासा मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. घरगुती सिलेंडरची किंमत सध्या मुंबईत 1102.50 रुपये असून वरील घोषणेननंतर आता मुंबईकरांना घरगुती गॅस सिलेंडरसाठी एक हजार रुपयेहून कमी किंमत मोजावी लागेल.
पेट्रोल-डिझेलच्या दरातही दिलासा?
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकार दिलासा देण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी चांगली कमाई केली असून करोनाच्या वेळी झालेले नुकसान आता भरून निघाले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार वाहन इंधनाच्या दरातही मोठी कपात करू शकते.
What's Your Reaction?






