हायवाने तीन बहिण भावंडांना चिरडल्याने कुटुंबावर आघात, बहिणीचे नोकरीचे स्वप्न अर्धवट
 
                                हायवाने तीन बहीण भावाला चिरडल्याने कुटुंबावर आघात...!
बहिणीचे नोकरीचे स्वप्न अर्धवट... कुटुंबातील सदस्यांचा घाटी रुग्णालयात हंबरडा
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) झाल्टा फाटा येथे हायवा ट्रकने तीन बहीण भाऊ दुचाकीवरून जात असताना सकाळी दहा वाजेदरम्यान चिरडल्याने जागीच ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
बहीण प्रतिक्षा भगवान अंभोरे (वय 20) राहणार आकोली, तालुका जिंतूर
हि वन विभागाची एमआयडीसी शारीरिक चाचणी घेऊन परत तिघे भाऊ बहीण दुचाकीवरून झाल्टा फाट्याकडून देवळाई चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या हायवाने दुचाकी स्लिप होऊन तिघे जागीच ठार झाले यादरम्यान हायवाचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या अपघातात भाऊ प्रविण भगवान अंभोरे (वय 28), प्रदिप भगवान अंभोरे (वय 20) हे दोघे भावांचाही मृत्यू झाला आहे.
तिघांचे मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणले तेव्हा नातेवाईकांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच शोक व्यक्त केले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी शव विच्छेदनसाठी घाटी रुग्णालयात पाठवले. हि घटना पाटीलवाडा हाॅटेलसमोर घडली.
हे तिघे बहीण भावंडे बायपासवर भाड्याच्या घरात राहत होते. भाऊ प्रविण एका दुकानात कामाला होता तर प्रदीप शिक्षण घेत होता. आई वडील परभणीत आहे.
बहीण वनविभागात नोकरीसाठी शारीरिक चाचणी घेऊन परत सोबत येत असताना हा अपघात घडला. अशी माहिती चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली आहे. एएसआय मदन नागरगोजे हे पुढील तपास करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात आक्रो
 
श केला.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            